महाराष्ट्र एडवोकेट प्रीमियर लीग 2021पहिल्या सामन्यात लातूर संघाने ने ठाणे सी संघाला 7 विकेट ने पराभूत केले.
नाशिक(सा.लातूर क्रिडा वार्ता )महाराष्ट्र एडवोकेट प्रीमियर लीग 2021च्या पहिल्या सामन्यात लातूर संघाने ठाणे सी संघाला 7 विकेट ने पराभूत केले.नाशिक येथे चालू असलेल्या एडवोकेट प्रीमियर लीग 2021 आज दि.27 डिसेंबर रोजी आयोजित पहिल्या सामन्यात लातूर संघाने ठाणे सी संघाला 7 विकेट ने पराभूत केले.प्रथम फलंदाजी करताना ठाणे सी संघाने 20 ओहर मध्ये 80 धावा काढले.लातूर संघाच्या गोलंदाज ऍड.शिवराज राजूरे आणि ऍड.राहुल कोयले यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतले.नंतर लातूर संघाने फलंदाज़ी करताना ऍड.मजहर शेख यांनी 14 चेंडूत 28 धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर ऍड.अतुल पाटिल आणि ऍड.आशीष बिडवे यांनी चांगली फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला.लातूर संघाने 10 ओवर मध्ये 3 विकेट गमावुन विजय प्राप्त केला.सर्व मित्र परिवार व लातूर जिल्हा वकील मंडळातर्फे संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.