आसिफ पटेल यांना लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्काराने सन्मानित
औसा (प्रतिनिधी) येथील रहिवाशी इंडिया टीव्ही न्यूज चैनल चे लातूर जिल्हा प्रतिनिधी तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षापासून विविध सामाजिक राजकीय उपक्रम केल्याने लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच मराठवाडा अधिवेशन १८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आले. तेव्हा अपुऱ्या वेळेअभावी काही उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकार व उत्कृष्ट तालुकाध्यक्ष हे पुरस्कार देण्याचे राहून गेले होते. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी औसा येथील इंडिया टीव्ही जिल्हा संपर्क कार्यालय येथे बैठक घेऊन उत्कृष्ट तालुका अध्यक्ष म्हणून अनेक समाज सेवेची कार्य केलेल्या असल्याचे बोलून दाखवत त्यांचे लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. येत्या १८ डिसेंबर रोजी ठाणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात सर्व पत्रकारांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन करून लातूर येथील अधिवेशनात सहभागी झालेल्या पत्रकार यांनाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक देडे, औसा तालुका अध्यक्ष आसिफ पटेल, बालाजी उबाळे, मज़हर पटेल, शमशुल हक्क काझी, तोफिक कुरेशी, एम बी मनियारी, इलियास चौधरी सह शहरातील व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.