मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी औसा मुस्लीम विकास परिषदेचे निवेदन
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
गेल्या तीस वर्षांपासून मुस्लीम समाजाच्या शिष्यवृत्ती, आरक्षण, तसेच मौलाना आझाद महामंडळ, वक्फ जमिनीवरील अतिक्रमण या विषयांवर मुस्लीम विकास परिषद आंदोलन करीत असून, मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम विकास परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुस्लीम समाजाची शैक्षणिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिली ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती द्यावी, पाच टक्के आरक्षण द्यावे, मौलाना आझाद महामंडळाला ५०० कोटी
रुपये उपलब्ध करून द्यावेत, वक्फ जमिनीवरील अतिक्रमणे काढावीत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांबाबत विचार न केल्यास मुस्लीम विकास परिषद रस्त्यावर येऊन आंदोलन करील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदनावर मुस्लीम विकास परिषद औसा तालुका अध्यक्ष मन्सूर रुईकर, उपाध्यक्ष रियाज पटेल, कोषाध्यक्ष दख्खन शेख, शहराध्यक्ष नदीम सय्यद, प्रा. डॉ. सय्यद मुदस्सीर, जिल्हा उपाध्यक्ष गुलाब सय्यद, अॅड. फय्याज पटेल, अॅड. शहानवाज पटेल, अॅड. युसूफ शेख, अॅड. मजहर शेख, अॅड. इम्रान शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.