लातुरातुन मूस्लीम आरक्षण यासाठी मागणीसाठी मागील २१ वर्षांपासून लढा सुरु आहे त्याच लातुरात गांधी चौक येथे निदर्शने

 ज्या लातुरातुन मूस्लीम आरक्षण यासाठी मागणीसाठी मागील २१ वर्षांपासून लढा सुरु आहे त्याच लातुरात गांधी चौक येथे निदर्शने..

---------------------------------




५ % मुस्लिम आरक्षणाची अमंलबजावणी करा

 निदर्शने आंदोलन 

मुंबई येथील हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहेत तसे पाहता ज्या लातुरातुन मुस्लिम विकास परिषदेच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. वहिदाभाभी यांनी व लातुरचे भुमीपुत्र स्व: महेबुब पाशा शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे विचार घेऊन मुस्लिम आरक्षणाचा लोकलढा लोकशाही मार्गाने २१ वर्षांपुर्वी महाराष्ट्र भर आंदोलने करून मुस्लिम समाजात जनजागृती करून आंदोलन उभारले होते मुस्लिम आरक्षण मिळाले पण भाजप शिवसेना शासनाने अमंलबजावणी केली नाही तेव्हा हि मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केली होती जसे वाचा शासकीय / निमशासकीय सेवामध्ये आणि शैक्षणिक संस्थामध्ये मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत अल्पसंख्याक विकास विभाग शासन निर्णय क्र. अविवि २०१४ / प्र.क्र. ८१/ का-७ मंत्रालय मुंबई दिनांक १९ जुलै २०१४ शासन निर्णय महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्या समाजासाठी भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १५ (४) १५ (५)१६(४) व ४६ मधील तरतुदी नुसार विषेश मागास प्रवर्ग (अ) (Special Background Category -A ) निर्माण करून त्यामध्ये सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटाचा समावेश करण्यात येत आहे शासन अध्यादेश क्रमांक १४ दिनांक ०९ जुलै २०१४ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विषेश मागास प्रवर्ग (अ) अंतर्गत शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरतीमध्ये व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी ५% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे तसेच लातूरकर मुस्लिम आरक्षण समीतीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या