औसा-उसमानाबाद राज्यमार्गावर मौजे शिवली येथे मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

 औसा-उसमानाबाद राज्यमार्गावर मौजे शिवली येथे मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन








औसा प्रतिनिधी

  औसा तालुक्यातील लातूर ग्रामीण मधील २६ गावे औसा महावितरणने उपविभागातून काढून मुरुड उपविभागाकडे हस्तांतरित करण्याचा पारीत केलेला आदेश रद्द करावा व  कसलीही पूर्वसूचना न देता या भागातील शेतकर्याच्या शेतातील शेती पंपाचा खंडित करण्यात आलेला विज पुरवठा तात्काळ जोडण्यात यावा. या प्रमुख  मागणीकरिता आज दिनांक 31 डिसेंबर 20 21 शुक्रवार रोजी औसा-उस्मानाबाद राज्यमार्गावर मौजे शिवली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली याभागातील शेकडो शेतकर्‍यासंह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

  या प्रसंगी शिवली चे सरपंच सुधाकर खडके,टाक्याचे उपसरपंच अतुल शिंदे,धनराज गिरी,दाजी देवशिंगकर, समाधान जोगी, गुणवंत लोहार,मनसेचे महेश बनसोडे,जीवन जंगाले,राजेंद्र कांबळे,ज्ञानेश्वर गरड,तानाजी गरड,नवनाथ कुंभार, संतोष कोल्हापुरे,बाळू सोलाने, गोविंद चव्हाण,नितीन गरड,प्रहारचे तालुकाध्यक्ष सयाजी पाटील, चंद्रकांत गरड,सुरेश चव्हाण,नागनाथ हिप्परकर, अमोल पाटील,गोपाळ पाटील, संतोष कुरे, मारुती शिरसागर,लक्ष्मण सुरवसे,सदाशिव जाधव,ज्ञानेश्वर फुटाणे,सुरेश वाघमारे,दयानंद शिंदे,अच्युत ईरपे, राजाराम चिखले, समाधान खडके, रामहरी डिगे,गजानन ईरपे, गुणवंत कुंभार, इत्यादी नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व परिसरातील शेतकरी,ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या