पुरस्कारामुळे पुरस्कारर्थींची जबाबदारी वाढते - आ.काळे पुरस्कारामुळे जीवनाला उभारी मिळते-आ.अभिमन्यु पवार

 पुरस्कारामुळे पुरस्कारर्थींची जबाबदारी वाढते - आ.काळे

पुरस्कारामुळे जीवनाला उभारी मिळते-आ.अभिमन्यु पवार






लातूर ः येथील सप्तफेरे वधू-वर सुचक केंद्राच्यावतीने प्रतिवर्षी गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. धार्मीक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक, इतर सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्था व पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या मान्यवरांचा सन्मान केला जातो. या वधूवर केंद्राच्यावतीने आतापर्यंत 200 व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे हे नववे वर्ष असुन यावर्षीही हा सोहळा मोठ्या थाटामाटाच्या वातावरणात उत्साहात पार पडला.
विविध क्षेत्रात कार्य करणार्‍यांची उचित दखल घेवून या वधूवर सुचक केंद्रामार्फत त्या-त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा सन्मान संस्थेमार्फत केला जातो. 30 डिसेंबर 2021 रोजी लातूर येथील प्रशासकीय इमारतीच्या डी.पी.डी.सी.हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. औशाचे आमदार अभिमन्यु पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे हे होते तर प्रमुख आकर्षण टि.व्ही.स्टार कलाकार बालाजी सुळ, सुप्रसिध्द प्लास्टीक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, आघाडीचे बिल्डर डॉ.धर्मवीर भारती, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे, उदगीर लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा वैजापुरे, युवा उद्योजक नागनाथ गित्ते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारर्थींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
या गौरव सोहळ्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या झी चोवीस तासचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील यांना पत्रकार रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले तर कोरोना काळात अखंड सेवा देणारे डॉ.गंगाधर परगे, डॉ.मोनीका पाटील, डॉ.अशितोष वैरागे, जुबेर सय्यद, डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माहिती तंत्र शिक्षकरत्न म्हणून उदय देशपांडे, समाजरत्न पुरस्काराने दत्तात्रय माळी, साहित्यरत्न पुरस्काराने धनंजय गुडसूरकर, तंत्रस्नेही शिक्षणरत्न पुरस्काराने उमेश खोसे, कविरत्न पुरस्काराने भारत सातपुते, जीवन गौरव पुरस्कार महेंद्र साळवी, नृत्य कलारत्न पुरस्कार कु.सृष्टी जगताप यांचा सन्मान करण्यात आला. तर सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या लातूर जिल्ह्यातील आघाडीच्या संस्थापैकी एक ग्रीन लातूर वृक्ष टीमचा सत्कार वृक्षमित्र संवर्धन रत्न पुरस्कार देवून, तर रयत प्रतिष्ठान पुरस्कार, दिशा प्रतिष्ठान, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र,निश्‍चल पुरी फाऊंडेशन यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सप्तफेरे वधू-वर सुचक केेंद्राचे संस्थापक अध्यक्ष संजय राजुळे यांनी केले. धनराजअप्पा परसने यांनी पुरस्कारार्थींची निवड कशी करण्यात आली याबद्दल माहिती दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश परळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गंगाधर डिगोळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी संजय राजुळे, माधव तरगुडे, धनराजअप्पा परसणे, विठ्ठलराव राऊत, दत्तात्रय परळकर, बालाजीअप्पा पिंपळे, विद्यासागर पाटील, लोमटे एन.बी., मंचक रंडाळे, दत्तात्रय पवार अ‍ॅड.जितेंद्र पाटील, जितेंद्र सराफ, बसवराज पटणे, मनोज पटवारी, संतोष सोनवणे, योगनंद जोशी, गुरूराज माळेवाडे, भागवत भोसले, रविकांत जाधव, केशव येदले, राजकुमार चलवा, सुरेश पवार, अजयकुमार चलवा, संदीप मुतखेडे, भालचंद्र गुरव, सिध्देश्‍वर चलवदे, विकास राजुळे, वीरभद्र तरगुडे, विशाल पाटील, अमितअप्पा पाटील, चेतन पाटील, रामराज काळे, शंभु सुर्यवंशी, सुनिल ईबीतदार, गोविंद सांगवे, महेश बिडवे आदिंनी परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात पार पडला.
उत्कृष्ट जीवन जगण्याचा उपदेश देण्यासाठी एक गुरू आवश्यक आहे ः डॉ.लहाने
प्रत्येकाच्या जीवनात एक गुरू असला पाहिजे तरच त्याचे जीवन समर्पक होते असा मौलीक सल्ला गुरूजींचे सविस्तर उदाहरण देवून पटविण्याचा प्रयत्न डॉ.विठ्ठल लहाने यांनी केला.
पुरस्कारामुळे पुरस्कारर्थींची जबाबदारी वाढते - आ.काळे
याप्रसंगी बोलतांना आ.विक्रम काळे म्हणाले की, लातूरमध्ये जो-जो आला त्याला लातूरकरांनी भरभरून असे प्रेम दिले. त्या प्रेमाच्या जोरावरच त्याने प्रगती केली आपल्या अनोख्या शैलीमध्ये त्यांनी स्टेजवर बसलेल्या मान्यवरांकडून करण्यात आलेल्या भाषणांचा खुरपूस समाचार घेवून कार्यक्रमात रंगत आणली. व याप्रसंगी त्यांनी ओमीक्रॉन या नवीन आलेल्या रोगासंदर्भातही माहित देत सर्वांनी काळजी घ्यावे व मास्कचा वापर करावा असे आवाहन केले.
पुरस्कारामुळे जीवनाला उभारी मिळते-आ.अभिमन्यु पवार
आ.अभिमन्यु पवार यांनी यावेळी बोलतांना राजुळे परिवाराचे आभार मानत त्यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलविले हे मी माझे भाग्य समजतो अशी भावना व्यक्त केली तर लातूरचे नाव आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर असुन ते नावलौकीक करण्याचे काम लातूरमधील प्रत्येक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींने केले आहे. हे खरोखर वखाण्याजोगे आहे. राजुळे सारखा व्यक्ती जो की या मराठवाड्यातील आहे तोही लातूरमध्ये येवून अशा प्रकारचे कार्य करतो हे खरोखरच समाजासाठी आदर्श आहे अशी भावना त्यांनी यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना व्यक्त केली.
गुणगौरवामुळे जीवन प्रोत्साहीत होते-बालाजी सुळ
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले बालाजी सुळ यांनी यावेळी संबोधीत करतांना आपल्या अनोख्या शैलीमध्ये नेत्याचा व कलाकाराचा संदर्भ देवून दोन्हीमध्ये फरक काय आहे हे आपल्या शैलीत सांगुन सर्वांच्याच चेहर्‍यावर हसु उगविण्याचे काम केले.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या