ट्वेन्टीवन शुगर्स लि., गळीत हंगाम*
*१ लाख ५८ हजार मे. टन विक्रमी गाळप*
*मांजरा परीवारा प्रमाणे प्रतिटन २२०० रूपये पहिला हप्ता*
· कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळपास प्राधान्य
· शेतकऱ्यांची ऊस बिले विलास सहकारी बँकेत जमा
· बॅक शाखेच्या माहितीसाठी गावाजवळील गट कार्यालयाशी संपर्क साधावा
लातूर प्रतिनिधी बुधवार दि. १ डिंसेबर:
राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर तालुक्यातील मळवटी येथील ट्वेन्टीवन शुगर्सच्या दुसऱ्या गळीत हंगामास विक्रमी ऊस गाळपाने सुरूवात झाली आहे. या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला २ हजार २०० रूपये प्रति टन प्रमाणे ऊस बिलाचा पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे. सभासद व ऊसउत्पादकांनी ऊसबीला संदर्भात आपल्या गावा जवळील शेतकी विभागाच्या गट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी साखर कारखानदारी उभारली आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक क्रांती आली आहे. सहकारमहर्षी म्हणून ओळख निर्माण झालेले, माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साखर कारखानदारी अत्यंत चांगल्या पध्दतीने चालवली जात आहे. शेतकऱ्यांची सोय व्हावी, त्यांनी लागवड केलेल्या संपूर्ण उसाचे गाळप व्हावे, ग्रामीण भागातील जीवनमान बदलले जावे याकरीता लातूरनजीकच्या मळवटी परिसरात ट्वेन्टीवन शुगर्स लि.,चा अद्ययावत असा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे.
*पहिला हप्ता २ हजार २०० रूपये अदा*
*ऊसबीलासाठी गट कार्यालयाशी संपर्क करावा*
ट्वेन्टीवन शुगर्स कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये आता पर्यंत हंगामात ३५ दिवसात विक्रमी गाळप १ लाख ५८ हजार ३१२ मेटन ऊसाचे गाळप केले आहे. या गाळप झालेल्या ऊसाला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवारा प्रमाणे प्रतिटन २ हजार २०० रूपये ऊसबीलाचा पहिला हप्ता अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांची ऊस बिले विलास सहकारी बँकेमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला असून संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या गावा जवळील विलास सहकारी बँकेमध्ये खाते उघडावे तसेच आपले गाव विलास सहकारी बँकेच्या कोणत्या शाखेच्या अंतर्गत येत आहे याकरिता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा.
माजी मंत्री मांजरा परिवाराचे मार्गदर्शक व कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार गळीतास आलेल्या उसाला एफ.आर.पी.ऊस दरापोटी प्रति मे.टन रु.२२००/-(दोन हजार दोनशे रूपये) प्रमाणे अग्रीम उचल अदा करण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार १५ नोव्हेंबर या दरम्यान गळितास आलेल्या ऊसाला कारखान्याकडून एफ.आर.पी.ऊस दरापोटी अग्रीम उचल प्रति मे. टन रु. २२००/- (दोन हजार दोनशे) प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. तरी ज्या ऊस उत्पादकांचा १५ नोव्हेंबर दरम्यान ऊस गाळपास आलेला आहे. त्यांनी आपल्या बीला संदर्भात ऊस बील शाखेची माहिती घेण्यासाठी गावा जवळच्या शेतकी विभागाच्या गट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन विजय देशमुख व कार्यकारी संचालक एस.बी.सलगर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.