अहमदनगर जिल्ह्यातील मौजा जेवूर येथे महेदवी मुस्लिम स्मशानभूमीचा क्षेत्रफळ नोंदीत कपात महसूल खात्या विरोधात LMM ची तक्रार

 अहमदनगर जिल्ह्यातील मौजा जेवूर येथे महेदवी मुस्लिम स्मशानभूमीचा क्षेत्रफळ नोंदीत कपात 

महसूल खात्या विरोधात LMM ची तक्रार




 लातूर (मोहम्मद मुस्लिम कबीर) अहमदनगर जिल्ह्यातील मौजा जेवर येथील हजरत बीबी भिका(रजी) यांचा दर्गा शरीफ असून तो सर्व्हे क्रमांक 1371 मध्ये असून त्याची महेदवी मुस्लिम स्मशानभूमी या नावाने महसूल विभागात नोंद आहे.


 महसूल नोंदीनुसार, या जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजेच दर्गा शरीफ २००३-२००४ पर्यंत २ गुंठे (२००० चौ. फूट) होते. परंतु ते आता केवळ एक गुंठा शिल्लक राहिले आहे. मग बाकी चा 1 गुंठा कोठे गेला. अशी विचारणा करण्यात येत आहे.


  मुस्लिम महदविया समाजाच्या इमाम सय्यद मुहम्मद मेहदी मावुद (अलै) यांच्या पत्नी उम्म अल-मुसद्दिकीन हजरत बीबी भिका (रजी)यांना या दर्गा शरीफमध्ये दफन करण्यात आले आहे.

 या संदर्भात एलएमएम ग्रुप चे अध्यक्ष सैय्यद दिलावर फररुख यांनी, जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे या जमिनीच्या  नोंदीत  तातडीने आवश्यक दुरुस्त्या करून या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणी केली आहे. माहितीसाठी कृपया संपर्क साधा. श्री शेख अब्दुल समद साहिब अहमदनगर 9823456390.असे आवाहन केले आहे.

 आपल्या मागणीमध्ये एलएमएम ग्रुपचे अध्यक्ष सय्यद दिलावर फारुख यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना कब्रस्तान आणि त्याबाबत माहिती दिली आहे.हजरत सय्यद मुहम्मद मेहदी (अ.) यांचे पाचवे खलिफ हजरत बंदगी मियाँ शाह दिलावर(रजी) यांचे नातू होते.  छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजा भोसले यांना हजरत शाह शरीफ मज्जूब यांच्या कृपेने अहमदनगरमध्ये संतान प्राप्त झाल्याचा विश्वास होता.




 मो. मुस्लिम कबीर,

 लातूर जिल्हा वार्ताहर,

 उर्दू मीडिया

 9175978903/9890065959

 alkabir786@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या