1 फेब्रुवारी लेखा व कोषागारे दिन लेखा व कोषागारे (काल व आज)

     1 फेब्रुवारी लेखा व कोषागारे दिन

लेखा व कोषागारे (काल व आज)





महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाच्या नियंत्रणाखाली 1 जानेवारी 1962 पासून लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना करून कोषागाराचे नियंत्रण संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य मुंबई  यांच्याकडे विभागप्रमुख या नात्याने सोपविण्यात आले.  1962 पूर्वी जिल्हा कोषागारे वित्त विभागाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली होती आणि शासन सचिव, वित्त विभाग हे जिल्हा कोषागारांचे विभागप्रमुख होते.  यापूर्वी वित्त विभागाने 1 एप्रिल 1955 पासून जुन्या मुंबई राज्यातील कोषागारे महसूल विभागाकडून आपल्या नियंत्रणाखाली आणली. भुतपूर्व हैद्राबाद राज्यातील कोषागारे ही त्या शासनाच्या वित्त विभागाच्या नियंत्रणाखाली होती व राज्य पुनर्रचनेनंतर, दिनांक 1 नोव्हेंबर 1956 पासून ती थेट मुंबई राज्याच्या वित्त विभागाच्या नियंत्रणाखाली आली. तथापि विदर्भातील कोषागारे ही महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली होती ती    1 जानेवारी 1958 पासून वित्त विभागाच्या नियंत्रणाखाली घेण्यात आली.

 राज्यातील सर्व जिल्हा कोषागारे ही संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांच्यामार्फत शासनाच्या वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणली.  मात्र तहसीलच्या ठिकाणी असलेली उपकोषागारे महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली होती. ही उपकोषागारे संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांच्यामार्फत वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यासाठी दिनांक 1 एप्रिल 1964 रोजी 24 उपकोषागारांचा एक गट व दिनांक 1 जून 1968 रोजी 98 उपकोषागारांचा आणखी एक गट वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात आला.  आता राज्यातील सर्व 290 उपकोषागारे वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहेत.  दि. 1 जानेवारी 1962 पासून लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना करण्यात आल्यानंतर शासनाच्या व्यवहारासंबंधीच्या लेख्यांचे काम पाहणारी सर्व जिल्हा कोषागार कार्यालये. वित्त विभागाचे कोषागार निरीक्षण पथक, अधिदान व लेखा कार्यालय,मुंबई. संचालक, स्थानिक निधी लेखा, मुंबई यांचे कार्यालय.  भांडार पडताळणी विभाग. लेखा कार्यालये (प्रशिक्षण), वित्त विभागातील दक्षता पथक शाखा इ. कार्यालये व संलग्नित शाखा या संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आणल्या.

अधिदान व लेखा कार्यालय मुंबई या कार्यालयाची मुख्यालयाचे प्रदानाचे काम पार पाडण्यासाठी दिनांक 1 एप्रिल 1955 रोजी स्थापना करण्यात आली.  हे काम यापूर्वी महालेखापाल, मुंबई यांच्याकडून पार पाडण्यात येत होते.

            लेखा प्रशिक्षण कार्यालयाकडून कोषागार लिपिकांना आणि इतर विभागातील व कार्यालयातील लेखाविषयक कामकाज पार पाडणार्‍या लिपिकांना प्रशिक्षणांची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.  सध्या मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक,अमरावती येथे प्रशिक्षण वर्ग आहेत.

            1 जानेवारी 1962 पासून लेखा व कोषागारे संचालनालय स्थापन झाल्यानंतर वित्त विभागास दुय्यम असलेल्या लेखा कार्यालयातील पर्यवेक्षकीय संवर्गाची पुनर्रचना वित्त विभागाखेरीज इतर शासकीय विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील लेखाविषयक बाबीचे काम पाहणारी पदे विचारात घेऊन एकत्रित राज्यासाठी वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली  शासनाने  फेब्रुवारी 1965 पासून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना केली.  यामध्ये निरनिराळ्या शासकीय विभागांमधील लेखाविषयक कामे करणाऱ्या  सर्व राजपत्रित व अराजपत्रित पर्यवेक्षी पदांचा समावेश करण्यात आला.  यामुळे केवळ निरनिराळ्या शासकीय विभागांमध्येच नव्हे तर मंडळे, महामंडळे, प्रकल्प, विद्यापीठे, जिल्हा परिषदा, वाणिज्यिक विभाग, स्थानिक निधी लेखापरिक्षा कार्यालय इत्यादी मध्ये देखील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीची कामे करण्यासाठी पुरेशी अर्हता व अनुभव असलेले प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध होऊ शकतात.  तसेच यामुळे कर्मचाऱ्याना सर्वांगीण अनुभव मिळण्याच्या दृष्टीने, त्यांची अदलाबदल करण्याची सोय उपलब्ध होते.  1 फेब्रुवारी 1965 रोजी या सेवेमध्ये एकूण 375 कर्मचारी होते. ही संख्या 2540 इतकी झालेली आहे.

            1 जानेवारी 1962 पासून लेखा व कोषागारे संचालनालय स्थापन झाल्यानंतर पुणे व नागपूर येथे दोन प्रादेशिक कार्यालयेही स्थापन करण्यात आली.  सन 1980 नंतर महसूल विभागाप्रमाणे प्रादेशिक कार्यालयाची पुनर्रचना करुन अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभाग अशी चार प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यात आली.  उपसंचालक (सध्या सहसंचालक) लेखा व कोषागारे यांना प्रादेशिक विभागप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. 

भांडार पडताळणी शाखा

            लोकलेखा समितीने 1944-45 च्या विनियोजन लेख्यावरील लेखा अहवाल व केलेल्या शिफारशीनुसार शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक 9281/33, दिनांक 16 ऑक्टोबर 1952 अन्वये वित्त विभागाचा एक भाग म्हणून स्वतंत्र भांडार पडताळणी शाखेची स्थापना करण्यात आली.  त्यानंतर 1 जानेवारी 1962 पासून स्थापना करण्यात आलेल्या लेखा व कोषागारे संचालनालयाकडे वित्त विभागाची भांडार पडताळणी शाखा  विलीन करण्यात आली.  शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक डीएटी-1064/584/सी-12 दिनांक 1 फेब्रुवारी 1965 अन्वये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा दिनांक 1 फेब्रुवारी 1965 स्थापन करण्यात आली आणि भांडार पडताळणी अधिकारी व भांडार निरीक्षक या पदांचा उक्त सेवेच्या अनुक्रम गट-ब व गट-ब (अराजपत्रित) मध्ये अंतर्भाव करण्यात आला.

            भांडार पडताळणी शाखेमार्फत शासनाच्या विविध विभागीय कार्यालयाच्या ताब्यातील साठ्यांची व भांडारांची पडताळणी केली जाते.

राज्य अभिलेख देखभाल अभिकरण

            केंद्र शासनाने दिनांक 01 एप्रिल 2004 पासून लागू केलेली नवीन परिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना महाराष्ट्र राज्यात लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला.  या निर्णयास अनुसरुन दिनांक 01नोव्हेंबर,2005 पासून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक 31ऑक्टोंबर,2005 च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले.

            सदर योजने खालील कपाती प्रत्यक्षात सप्टेंबर, 2007 पासून सुरु झाल्या असून पूर्वीच्या कालावधीतील थकबाकी प्रत्येक महिन्यासोबत एक महिना या प्रमाणे करण्यात येत आहे. या योजनेखाली 249279 एवढ्या शासकीय कर्मचाऱ्याची नोंदणी झाली आहे

व्हर्चुअल ट्रेजरी

            महाराष्ट्र शासनाच्या कर व करेत्तर रकमा ‘इंटरनेट बँकींग’ सुविधेचा वापर करुन करदात्यांना इलेक्ट्रॅानिक पध्दतीने भरता याव्यात, यासाठी शासन वित्त विभागाने ’शासकीय जमा लेखांकन पध्दत (GRAS) ही प्रणाली विकसित केली आहे.

बिम्स, बील पोर्टल, सेवार्थ या प्रणालीमधून संगणीकृत देयके तयार केली जातात. पारित झालेली देयकांची रक्कम EFT, NEFT व CMP व्दारे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी आणि लाभधारकांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. तसेच निवृत्तीवेतनधारकाचे पुरवणी/मासिक निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरणाची रक्कम सुध्दा CMP व्दारे सरळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे.

SMS व्दारे निवृत्तीवेतन धारकानां प्रथम ओळखपत्रासाठी संदेश देणे, मासिक / पूरवणी निवृत्तीवेतन देयक कोषागारात जनरेट झाल्याबरोबर SMS जाणे, हयात प्रमाणपत्राची संगणात नोद घेतल्यानंतर त्वरीत निवृत्तीवेतनधरकानां हयात प्रमाणपत्राची नोंद घेतल्याचा संदेश जाणे इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. कोषवहिनी/ अर्थवाहिनी व्दारे जिल्हा निहाय जमा व खर्च, आहरण व संवितरण अधिकारी निहाय जमा व खर्च, लेखाशिर्ष निहाय जमा व खर्च, कोषागारात दाखल केलेल्या देयकाचा स्टेटस इ. अनेक प्रकारची अद्यावत माहिती मिळू शकते. 

            सर्वसाधारण जिल्हयामध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सवंर्गातील वेगवेगळया विभागात संवर्गातील अधिकारी/          कर्मचा-यांची किमान 100 पदे कार्यरत असतात.                                                            (अण्णाराव भुसणे)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या