लातूर शहरातील आंबेजोगाई रोडवरील नवीन रेणापूर नाका परिसरात डॉ सय्यद मोहम्मद अब्दुल सत्तार यांच्या AS Eye Hospital & Skin Care Center चा शुभारंभ पालक मंत्री अमित देशमुख च्या हस्ते संपन्न


लातूर शहरातील आंबेजोगाई रोडवरील नवीन रेणापूर नाका परिसरात डॉ  सय्यद मोहम्मद अब्दुल सत्तार यांच्या AS Eye Hospital & Skin Care   Center  चा आज सायंकाळी शुभारंभ पालक मंत्री अमित देशमुख च्या हस्ते संपन्न 





#लातूर शहरातील आंबेजोगाई रोडवरील नवीन रेणापूर नाका परिसरात डॉ  सय्यद मोहम्मद अब्दुल सत्तार यांच्या AS Eye Hospital & Skin Care   Center  चा आज सायंकाळी शुभारंभ केला.लातूर शहर आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून पुढे येत असून, महापालिका व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी अर्बन क्लिनिक्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली, #कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहनही याप्रसंगी केले.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मौलाना इस्राईल साहब रशिदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, सुभाष काळदाते, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. उदय मोहिते हकीम शेख, डॉ शौकत मौलाना आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या