किनगाव-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गचे काम लवकरच.
अहमदपुर प्रतिनिधी हा अ खय्युम सहाब,
लातूर-परभणी जोडणारा राष्ट्रीय महामार्गाने किनगाव-गंगाखेड महामार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून या कामाची नुकतीच निविदा निघाली आहे.
किनगाव ते गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ के च्या रस्त्याच्या कामाची निविदा नुकतीच निघाली असून हे काम दोन वर्षात पुर्ण करावयाचे आहे.केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता मंजूर केला आहे. हा रस्ता २७.७ कि.मी इतका असून त्याची निविदा नुसार किमत-२२१६३१३७२२ रुपये आहे या कामाची मुदत दहा वर्षाची आहे हे काम लवकरच चालू होत असल्यांने अहमदपूरचे माजि आ.बब्रुवान खंदाडे, किनगावचे सरपंच किशोर मुंढे व ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त करून महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे आभार व्यक्त केले आहे हा रस्ता अनेक वर्षांनी दुर्लक्षीत होता वहानधारकास गाडी चालवतांना खडया-खुड्यामुळे तारेवरची कसराच करावी लागत होती किनगाव- गंगाखेड महामार्गामुळे पिंपळदरी,ईसाद येथील नागरिकांना या रस्त्याचा फायदा होणार आहे किनगाव येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे परभणी येथून येणाऱ्या व्यापाऱ्याची सोय होणार आहे गंगाखेड येथे रेल्वेचे जंक्शन व स्टेशन आहे प्रवाशांना औरंगाबाद, नांदेड मार्गे आंध्रा प्रदेश, कर्नाटक जाण्यासाठी सोय होणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.