किनगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील सह शिक्षक अनिल सुरवसे यांच्या सेवा निवृत्ती बद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
अहमदपुर प्रतिनिधी हा अ खय्युम शेख
किनगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील सह शिक्षक अनिल सुरवसे यांच्या सेवा निवृत्ती बद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.अनिल सुरवसे यांनी बत्तीस वर्ष अर्थशास्त्र व हिंदी विषयांचे अध्यापन केले.त्यांनी परिसरातील शाळा, गणेश मंडळ, मनोरंजनाच्या कार्यक्रमात चारशेवर एक पात्री नाटके, समाज प्रबोधनाची कार्यक्रम घेतल्याने त्यांची कलाकार म्हणून ओळख होती.त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाळेत सपत्नीक सत्कार करण्यात आला.या वेळी प्राचार्य प्रकाश कळसाईतकर, डाॅ.बबनराव बोडके, मुख्याध्यापक विठ्ठल नुत्ते, वैजनाथ मुंडे, पर्यवेक्षक लालासाहेब बोकडे, तानाजी माने, प्रा.रत्नाकर नळेगावकर, प्रा.संपत सिरसाठ, प्रा.नंदकिशोर पाटील, प्रा.गोविंद भगत, प्रा.शरद शिंदे, कैलास खानापुरे, सुशीलकुमार पाटील, जितेंद्र बदने, प्रमोद शिरूरकर, रेखा लटुरे यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.