उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी
प्रवेशिका पाठविण्यास 15 फेबुवारी पर्यंत मुदतवाढ
हिंगोली, (जिमाका)दि. 1 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2022 असा होता. तथापि या प्रवेशिका पाठविण्यासाठी आता 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्हयातील स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in येथेही उपलब्ध आहेत.
तरी या स्पर्धेत जिल्हयातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्र.जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती श्वेता पोटुडे यांनी केले आहे आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.