ज्ञानप्रकाश विद्यानिकेतनच्या 19 विद्यार्थ्यांचे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश
लातूर/प्रतिनिधी
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने घेतलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. प्रति वर्षाप्रमाणे या ही वर्षी ज्ञानप्रकाश विद्यानिकेतनच्या मुलांनी यात घवघवीत यश संपादन केले. ज्ञानप्रकाशच्या 6 वी वर्गातून एकूण 14 विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले तर 9 वी वर्गातून 5 विद्यार्थ्यांनी त्यात यश मिळवले.
मुलांना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी यासाठी ज्ञानप्रकाश मध्ये सातत्याने वेगवेगळे उपक्रम व प्रयत्न केले जातात. त्यात लोकविज्ञान अभ्यास, विज्ञान प्रयोग, करून पहा यांचा समावेश होतो.
तसेच 6 वी साठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना स्वतंत्र वेळ देऊन अधिकचा अभ्यास महेंद्र सूर्यवंशी करून घेतात. त्यामुळे मुलांचं निकालतील प्रमाण वाढत आहे.
यावर्षी 6 वी गटातून यश संपादन केलेल्या मुलांमध्ये पियुष बिराजदार, संस्कार राऊतराव, प्रथमेश मेकले, श्रीहर्ष शिरुरे, हर्ष अपसिंगे, खुशी चिंते, आर्या तुगावकर, सार्थक हुलगे, आर्यन मोटेगावकर, अथर्व मोटेगावकर, आदित्य रणखांब, अनुष्का श्रीखंडे, प्रणव चव्हाण, शरयू हिप्परगेकर
इयत्ता- 9 वी गटातून अनूज फुलसे, तेजस माने, सिद्धी स्वामी, अनुष्का बिरादार, मयुरी चव्हाण दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन महेंद्र सूर्यवंशी, सुचेता चाकूरकर यांनी केले. सर्व यशस्वी मुलांचे व मार्गदर्शकांचे ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे, मुख्याध्यापिका सविता नरहरे व पर्यवेक्षक अशोक गुरदाळे, प्रशांत शिंदे, संजय सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.