औसा तालुक्यात कोविड-19 दुसऱ्या डोसच्या लसीकरणात आलमला गाव प्रथम
आलमला : ता.औसा जि. लातूर येथील ग्रामपंचायतीने औसा तालुक्यातील कोविड 19 लसीकरणाच्या दुसऱ्या डोस मध्ये देखील तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गावामध्ये 2888 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते उद्दिष्ट दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी पूर्ण करून दुसऱ्या डोसचे लसीकरण करून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. ग्राम पातळीवर अनेक वेळा नियोजन करून प्रथम व दुसरा डोस वेळेवर सर्वांना देण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच ग्रामपंचायतीमध्ये सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेऊन लसीकरणाचे महत्त्व घरोघर जाऊन सर्वांना पटवून सांगितल्यामुळे हे शक्य झाले. तसेच बूस्टर डोस 37 जणांना देऊन आज रोजी 5815 जणांनी दोन्हीही डोस पूर्ण केले आहेत. या कोरोना महामारीत लसीकरणच तारू शकते याची खात्री सर्वांना झाली आहे. या कामगिरीसाठी डॉक्टर आर आर शेख साहेब तालुका आरोग्य अधिकारी औसा, डॉक्टर जी के रेड्डी वैद्यकीय अधिकारी भादा, डॉक्टर संतोष पाटील वैद्यकीय अधिकारी आलमला, गावचे सरपंच श्री कैलास निलंगेकर, उपसरपंच श्री खंडेराव कोकाटेव ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, प्राचार्य विश्वेश्वर धारशिवे, ठाकूर विनोद तसेच गावातील विविध संस्था पदाधिकारी तरुण मित्रमंडळ, आरोग्य विभागाच्या श्री शिंदे पी एस आरोग्य सेविका, बंडे भाऊ आरोग्य सेवक आणि आशाताई कार्यकर्त्या यांनी खूप परिश्रम घेतले त्यामुळे हे यश आज मिळालेले आहे. त्याबद्दल गावचे सरपंच कैलास निलंगेकर यांनी आरोग्य विभागाचे व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.