लातूर जिल्हयात महाविकास आघाडीचा निर्वीवाद विजय
नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत
काँग्रेस पक्षाला सर्वांधिक जागा मिळाल्या बददल
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
यांनी आनंद व्यक्त करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले
लातूर, दि. १९ जानेवारी २२:
लातूर जिल्हयातील चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ व जळकोट नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला निर्वीवाद विजय मिळाला असून काँग्रेस पक्षाला सर्वाधिक २३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १४ शिवसेनेला ६ जागेवर विजय मिळाला आहे. या निवडणूकीत मतदारांनी महाविकास आघाडीला जिल्हयात कौल दिला या बददल राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सर्व मतदारांचे आभार मानून महाविकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीला सामोरे जाताना लातूर जिल्हयात महाविकास आघाडीची माध्यमातून लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी पूढाकार घेऊन् निवडणूकीला सामोरे गेले. या निवडणुकीत चाकूर, देवणी, शिरूरअनंतपाळ व जळकोट येथे महाविकास आघाडी उमेदवारांसाठी प्रचार सभा घेण्यात आल्या. या सभेच्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी, मुलभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी संधी देण्याचे आवाहन मतदारांना नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते. तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेली विकासकामे मतदारां समोर ठेवण्यात आले. मतदारांनी जिल्हयातील नगर पंचायत निवडणूकीत विकासासाठी महाविकास आघाडीला कौल देऊन् मतदान केले आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वांधिक २३ जागा मिळाल्या असून देवणी नगर पंचायत मध्ये एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १४ जागा मिळाल्या असून शिवसेना ६ जागेवर विजयी झाली आहे. या पूढील काळात स्थानिक पातळीवर विकासाची साखळी मजबूत करून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पूढाकार घ्यावा, महाविकास आघाडी सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही, पालकमंत्री ना. देशमुख यांनी या निमीत्ताने दिली आहे.
या नगर पंचायत निवडणुक प्रचारात अहोरात्र परिश्रम केलेल्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व विजयी उमेदवरांचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले असून सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.