*टेलीप्रॉम्प्टर म्हणजे काय?*
टेलीप्रॉम्प्टर हे एक विशेष उपकरण आहे. ज्याच्या मदतीने वक्ता आपले भाषण वाचतो. अभिनेते किंवा गीतकार त्यांच्या ओळी बोलण्यासाठी देखील याचा वापरतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वक्त्याला त्याचे भाषण लक्षात ठेवावे लागत नाही. त्या जे बोलायचंय ते टेलीप्रॉम्प्टरच्या साहाय्याने तो अगदी सहजपणे बोलू शकतो. यावेळी श्रोत्यांना तो वाचून काहीतरी बोलतोय असं देखील वाटत नाही.
*टेलीप्रॉम्टर कसं काम करतं?*
तुम्ही जर एखाद्या नेत्याला भाषण देताना नीट पाहिलं असेल, तर त्याठिकाणी त्यांच्या शेजारी दोन मोठे काच लावलेले असतात. हेच काच टेलीप्रॉम्प्टर ग्लासेस आहेत. त्यावर, नेत्यांना जे बोलायचं असतं ते भाषण चालू असतं. नेत्यांना त्यामध्ये भाषण दिसतं तर, प्रेक्षकांच्या बाजूने तो एक सामान्य काच असल्याचे दिसते. टेलीप्रॉम्प्टर स्टँडवरील टेलीप्रॉम्प्टर काच काही 45 डिग्री वाकवून सेट केला जतो. मॉनिटर अगदी त्याच्या खाली ठेवलेला असतो. ज्यावर सॉफ्टवेअरच्या मदतीने स्क्रीप्ट दिसत असते. स्क्रीनवरील ते भाषण वक्ता अगदी सहज वाचू शकतो. पूर्वी त्याचा वेग आणि आकार मॅन्युअली अपडेट केला जायचा. पण आता सर्वकाही ऑटोमॅटिक झालंय. त्यांच्या बोलण्याच्या वेगानुसार टेलीप्रॉम्टरवरील स्क्रीप्ट सरकते. टेलीप्रॉम्प्टर ऑब्जेक्ट मिररिंग आणि रिफ्लेक्शन या तत्त्वावर काम करतात.
टेलीप्रॉम्टरचे प्रकार…
१- अध्यक्षीय टेलीप्रॉम्टर
टेलीप्रॉम्टरचे दोन प्रकार असतात. पहिला अध्यक्षीय टेलीप्रॉम्टर. पंतप्रधान मोदी जो टेलीप्रॉम्टर (Teleprompter) वापरतात हाच. या प्रकारच्या टेलिप्रॉम्प्टरचा वापर प्रामुख्याने राजकारणी भाषणे देण्यासाठी करतात. एका उंच स्टँडवर एक काच बसवलेला असतो. तो ४५ अंशाच्या कोनात वाकलेला असतो. आणि त्याच्या अगदी खाली, वक्त्याच्या केबिन किंवा पायाखाली, एक टॅब किंवा मॉनिटर ठेवला जातो. ज्याचं प्रतिबिंब टेलीप्रॉम्प्टरच्या काचावर तयार होते. वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा या काचात पाहून बोलतो. हे काच परावर्तनीय असल्याने ते बघणाऱ्यांना साधे वाटतात. त्यामुळे बोलणारा कुठेतरी बघून वाचतोय, असं वाटत नाही.
२) कॅमेरा टेलीप्रॉम्प्टर
या टेलीप्रॉम्प्टरचा वापर बातम्या वाचण्यासाठी आणि चित्रपट रेकॉर्ड करण्यासाठी केला जातो. यामध्ये, टेलीप्रॉम्प्टरच्या (Teleprompter) काचाच्या मागे कॅमरा असतो. आतल्या भागात काचावर बातम्या किंवा संवाद चालू असतात. अँकर किंवा अभिनेता आरशात पाहून ते बोलतात. आरशामागे बसवलेला कॅमेरा त्यांना रेकॉर्ड करत असतो. काचावर जे लिहिलेलं असतं ते फक्त आत बसलेल्या व्यक्तीला दिसतं, बाहेर फक्त अँकर आणि आवाज ऐकू येतो.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.