पटोलेंनी 'त्या' गुंडाची माहिती प्रसिद्ध करावी माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचे आव्हान

 पटोलेंनी   'त्या'  गुंडाची माहिती प्रसिद्ध करावी                     

माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचे  आव्हान  




              
   लातूर (प्रतिनिधी) :- मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला  खुलासा धादांत खोटा आहे’ असा आरोप  माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  केला आहे. ‘नाना पटोलेनी ह्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी असे आव्हानही आ.संभाजी पाटील निलंगेकर ह्यांनी या पत्रकाद्वारे दिले आहे. 
आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी या पत्रकात म्हटले आहे की ‘सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणा-या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे . महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह आहे. पटोले यांची भाषा पाहिली की कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणा-या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत’ अशी टीका देखील आ.निलंगेकर ह्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या