रस्त्याची रुंदी वाढल्याने विद्युत डिपी आला रस्त्यात, हटवण्याची होत आहे मागणी

 रस्त्याची रुंदी वाढल्याने विद्युत डिपी आला रस्त्यात, हटवण्याची होत आहे मागणी.


शेख बी जी









औसा.दि.१७ औसा शहराचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. या  भागांना योग्य रस्ते देण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून औसा- सारोळा रस्ता मंजूर करण्यात आला.या रस्त्याचे काम सिमेंट कॉंक्रीट मध्ये होऊन मोठा विस्तार झाल्याने या रस्त्यावर असलेला डीपी रस्त्यात आला आहे.या ठिकाणांहून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखाद्या लहान बालकाचा जर तोल गेला तर याठिकाणी मोठी हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी असलेला हा डीपी इतरत्र हलवावा अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करत आहेत.मुख्य रस्त्याच्या कडेला हा डीपी आला असल्याने वाहन धारक जीव हातात धरून वाहने चालवत आहेत.याच विद्युत डिपी मुळे २ जनावरांचा करंट लागुन मृत्यू झाला आहे अशी माहिती येथील इंजिनिअर अजहर हाश्मी यांनी दिली.

या संदर्भात आम्ही लवकरच विद्युत कंपनीला निवेदन देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रस्त्याच्या जवळ आल्याने हा डीपी धोकादायक ठरला आहे हा डीपी लवकर इतरत्र हलवावा अशी नागरिकांतुन मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या