लातूर कॉलेज फिजिओथेरेपी चा १००% निकाल

 लातूर कॉलेज फिजिओथेरेपी चा १००% निकाल   





नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत चालणाऱ्या परीक्षेतील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित ,लातूर कॉलेज ऑफ  फिजिओथेरेपी, हासेगाव या महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याकार्यक्रमाची सुरुवात  सरस्वती मातेच्या  प्रतिमेचे पूजन करून केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च चॅरिटेबल ट्रस्ट लातूर नवनिर्वाचित अध्यक्ष

श्री.अनिलअंधुरीकर,कार्यवाहक डॉ.राधेशाम कुलकर्णी ,डॉ.विनोद लड्डा यांचे संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे शाल ,श्रीफळ ,पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. आणि व्दितीय वर्गाचा निकाल ८०%व तृतीय वर्गाचा १००% लागला, तर व्दितीय वर्गातून उन्हाळी परीक्षेत प्रथम क्रमांक उरुसा सय्यद-(६७% ),  व्दितीय क्रमांक प्रगती रुद्राक्ष-(६७%) व व्दितीय वर्गातून हिवाळी-२०२० परीक्षेत प्रथम क्रमांक ऐश्वर्य राठोड (६२. ८५%) , व्दितीय क्रमांक नेहा ब्राह्मणे (६१.%) तर तृतीय वर्गातून उन्हाळी २०२१ परीक्षेत  प्रथम क्रमांक प्रियंका गांधी (७०%), व्दितीय क्रमांक सुनिधी शिंदे (६४%) या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला . श्री.शिवलिंग जेवळे सरांनी प्रस्ताविक भाषणातून संस्थेच्या वाटचाली बद्दल संपूर्ण माहिती दिली,तसेच डॉ.लड्डा सरांनी मुलांना मार्गदर्शन केले, मन शांत ,जिद्द एकाग्रता ठेवल्यावर जीवनात यश मिळते,  असे सांगितले तर श्री. अनिल अंधुरीकर सरांनी संस्थेच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भाषणातून मुलांना "शिक्षक होण्यासाठी उत्तम विध्यर्थी असावा लागतो ,व दिवा असा लावा कि जिथे अंधार आहे आणि कोणतीही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी फिजिओथेरेपी गरज आहे रुग्णाबद्दल प्रत्येक डॉक्टरांना प्रेम , अस्मिता असली पाहिजे आणि संस्थेच्या अध्यक्षांना मेडिकल, फार्मसी ,आशा विविध शैक्षणिक संस्था ग्रामीण भागात उभा केल्या बद्दल" शिक्षणमहर्षी "अशी उपाधी दिली "या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री.भीमाशंकरबावगे,कोषाध्यक्ष श्री. शिवलींग जेवळे,सचिव श्री.वेताळेश्वर बावगे, प्राचार्य श्री.नंदकिशोर बावगे ,संचालक श्री.आत्माराम मुलगे,प्राचार्य रब्बीक खान, अकॅडमीक इनचार्ज डॉ.सचिन कोकणे, डॉ श्रद्धा मॅडम ,डॉ. पावडशेट्टी यू .एस ,डॉ.क्षीरसागर ए.एस,डॉ.ख्याती शाह आदी शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपिस्थत होते. तर कार्यक्रमाचे समारोप प्राचार्य डॉ.रब्बीक खान यांनी केले व सूत्रसंचालन मयुरी तावडकर व नेहा ब्राह्मणे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या