*प्रजासत्ताक भारत देश ही महामानव* *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी* *दिलेल्या संविधानाची देणं आहे*
सामजिक कार्यकर्ते हिरामण ठोंबरे
पुणे प्रतिनिधी::लक्ष्मण कांबळे
.
सर्व प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भारतीय संविधान पुस्तिकेला पुष्पहार घालून ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी अनेक मान्यवरांनी आपआपले मत मांडले सामाजिक कार्यकर्ते हिरामण ठोंबरे यांनी *भारतीय संविधान हे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधानाची जनजागृती व्हावी असे आपले मत मांडत असताना म्हणाले*
संबंध देशात दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो .आपल्या देशाला जरी १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी .खरे स्वातंत्र्य हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतचे संविधान हे पुस्तकं लिहून. संविधान समितीकडे सुपूर्द केले.असता .हे संविधान पुस्तक स्वीकारले व २६जानेवारी १९५० साला पासून भारतीय संविधान अंमलात आले तेव्हापासून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक तथा यालाच गणराज्य दिन असे ओळखले जाऊ लागले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून *दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात* तयार करून
भारत देशाला लिखित स्वरूपात राज्यघटना लागू झाली या दिवसापासून देशात असलेली राजेशाही ,हुकूमशाही, दडपशाही संपली तेंव्हा पासून समता, बंधुता न्याय तसेच समतेची बीजे रोवली गेली म्हणजेच आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष, लोकशाही ,तत्वावर चालेल अर्थात *लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही*देशात राज्यघटना लागू झाल्यापासून प्रजेचे राज्य असलेला प्रजासत्ताक देश म्हणून जगाच्या पाठीवर आपल्या देशाची एक आगळी वेगळी ओळख झाली .*प्रजासत्ताक भारत देश ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची देण आहे.* प्रजासत्ताक भारत देश अबाधीत ठेवण्यासाठी संविधानाच्या रक्षणाचा प्रत्येक नागरिकांनी संकल्प केला पाहिजे
असे .पुणे औंध येथील सामाजिक कार्यकर्ते हिरामण ठोंबरे म्हणाले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.