युवकांचा सशक्तीकरण आवश्यक : डॉ. अब्दुल कदीर* *अशरा-ए-उर्दूचे चौथे पुष्प*

 *युवकांचा सशक्तीकरण आवश्यक : डॉ. अब्दुल कदीर*

*अशरा-ए-उर्दूचे चौथे पुष्प*




सोलापूर- ‘युवकांना योग्य दिशा देणे आणि त्यांचा सशक्तीकरण करणे आजची गरज आहे. शास्त्र व टेक्नॉलॉजी सहित भाषांचे ज्ञान युवकांमध्ये विश्वास वाढण्यास मदत होते. सर्व भाषा देवाच्या निशानी आहेत. भाषांबरोबर जी संस्कृती जुडली असते त्याची उपयोगिता पाहिली पाहिजे. कल्चरच्या नावाने पश्चिमी संस्कृतीपासून सावध राहणे हे युवकांना पटवून दिले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात आपण कसे उभा राहू शकतो याचा विचार विनिमय आवश्यक आहे’, असे प्रतिपादन शाहीन ग्रुप बीदरचे डॉ. अब्दुल कदीर यांनी केले.

अशरा-ए-उर्दू 2022 च्या चौथ्या पुष्पाचे गुंफण करण्यात आले. ‘सर सय्यद का तसव्वुरे जदीद तालीम’ या विषयावर ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी सर सय्यद, मिशनचे दिल्लीचे हाजी नसीमोद्दीन हे होते.

फोरमचे सचिव डॉ. म.शफी चोबदार यांनी प्रास्ताविकात अशरा-ए-उर्दूची माहिती देताना सांगितले की, उर्दू भाषा साहित्य व माध्यमच्या विकास व संवर्धनासाठी हा अशरा साजरा केला जातो. फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी सर सय्यदच्या कामाचा आढावा घेतला आणि सांगितले की, लाखात एखादा युग पुरुष निर्माण होतो जो क्रांती घडवतो आणि सर सय्यद हे लाखात एक होते. अध्यक्षीय भाषणात हाजी नसीमोद्दीन यांनी सांगितले की, शिक्षणांत गुणवत्ता वाढविण्यास भर दिला पाहिजे. अलीगढ चळवळ देशासाठी मार्गदर्शक ठरली आहे व सरसय्यदचे स्वप्न साकार करण्यासाठी संस्थानी आपले ध्येय व निश्चय ठरविले पाहिजे.

स्टुडंटस अकादमीच्या उमामा बागबान यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मालेगावचे अशफाक उमर, भुसावलचे हाजी अन्सार व शिरपूरचे डॉ. कादरी यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी कादिरहुसेन चोबदार यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या