आण्णाभाऊ साठे महामंडळाला १,५०० कोटी रुपये निधी व तात्काळ महामंडळावर अध्यक्ष नियुक्ती करा . सुधाकर भालेराव

 आण्णाभाऊ साठे  महामंडळाला  १,५०० कोटी रुपये निधी व तात्काळ महामंडळावर अध्यक्ष नियुक्ती करा . सुधाकर भालेराव




औसा विनोद जाधव 


 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गेल्या अनेक वर्षापासून बंद असल्यामुळे अनुसूचित जातीतील शेवटच्या पायरीवर अविकसित असलेल्या मातंग समाजाची अत्यंत हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. खऱ्या अर्थाने मातंग समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी या महामंडळाची निर्मिती झाली. परंतु सदर महामंडळामध्ये मातंग समाजाचा विकास साधण्यापेक्षा राजकीय डावपेच करुन तत्कालीन अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांनी संगनमतांनी महामंडळाच्या कोटयावधी निधीचा भ्रष्ट्राचार घोटाळे करुन सदर महामंडळ न्यायप्रविष्ट प्रक्रियेमध्ये अडकविण्यात आले. सदर महामंडळात दोषी असलेल्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु सदर महामंडळ बंद ठेवल्यामुळे


मातंग समाजाची फार मोठी आर्थिक हानी निर्माण झाली आहे.


अनेक वर्षापासून महामंडळ बंद असल्यामुळे मातंग समाजाचा विकास खुंटला आहे. त्यासाठी अधिकचा १,५०० कोटी (पंधराशे कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच त्यावर नव्याने अध्यक्षाची निवड तात्काळ करून मातंग समाजाचा आर्थिक, शैक्षणिक स्थर उंचावण्यासाठी विविध शैक्षणिक तसेच व्यावसायासाठी विना अट, विना तारण कर्ज उपलब्ध करुन मातंग समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यात यावा. अन्यथा नाविलाजाने मंत्रालयावर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.असे लिखित निवेदन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे दिले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या