औश्यातील गायरान जमिनीची सिटी सर्वेला नोंद प्रशासनाचा आंधळा कारभार,नोंदणी फेरफार रद्द करण्याबाबत उपअधिक्षकाकडे तक्रार

 औश्यातील गायरान जमिनीची सिटी सर्वेला नोंद


प्रशासनाचा आंधळा कारभार,नोंदणी फेरफार रद्द करण्याबाबत उपअधिक्षकाकडे तक्रार






औसा प्रतिनिधी औश्यातील प्रशासनांचा आणखीन एक अनागोंदी कारभारांचे पितळ उघडे पडले.चक्क गायरान म्हणून सातबाऱ्यावर नोंद असणाऱ्या जमिनीची सिटी सर्वेला नोंद केल्याचा समोर आले.यासह न.प.ने ही भोगवाटाधारक म्हणून नोंद घेत कळसच केला.या प्रकरणी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष भागवत म्हेत्रे यांनी भूमि उप-अधिक्षकाकडे तक्रार करून सदरचा रेकॉर्ड वरील फेरफार रद्द करण्याची मागणी केली.


शहरातील तहसील कार्यालया समोरील सर्वे.नं.८८ मध्ये असलेली जमिन ही गायरान म्हणून कागदोपत्री आहे.आज घडीलाही तशीच त्यांची नोंद असूनही मागील काळात भूमि अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांना हाताशी धरून चक्क गायरान जमिनीची मालकी हक्कात सिटी सर्वेला नोंद केली.सदरील जागेची न.प.च्या भोगवाटाधारक म्हणून नोंद दिसते.विशेष तहसील कार्यालयाच्या मालकीची असणाऱ्या जागेची सध्यस्थितीत सातबाऱ्यावर नाव नसतानाही पालिका मात्र त्यांचे भाडे वसूल करते.जागा गायरान,मालकी तहसीलची नोंद मात्र तिसऱ्यांचीच  करून प्रशासनाने कळसच केल्याचा प्रकार समोर आला.ज्यांचे नाव  सिटी सर्वेला घेण्यात आले.त्याच्याकडे मालकी हक्क बाबत काहीही पुरावा नसतानाही भूमि अभिलेख विभागाने नोंद कशी केली.हा प्रश्न निर्माण होतो.सदरची बेकायदेशीर घेण्यात आलेली नोंद रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले.




गायरान जमिनीची नोंद घेता येत नाही

------------

सदरील प्रकरणात गायरान जमिनीची सिटी सर्वेला नोंद घेण्यासाठी सबळ शासकीय पुराव्या विना घेता येत नाही. असे जर तपासणी दरम्यान आढळून आले तर सदरची नोंद रद्द करू,असे प्रभारी भूमि उप अधिक्षक मिसाळ यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या