शिक्षक परिषदेचा कर्तव्य बोध दिवस साजरा

 ---शिक्षक परिषदेचा कर्तव्य बोध दिवस साजरा --





 औसा-  औसा येथील विवेकानंद विद्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा लातूर च्या वतीने कर्तव्य बोध दिवस--- जागृती अभियान साजरा करण्यात आला.  अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमेश मलवाड उपस्थित होते. 

    अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा लातूर च्या वतीने कर्तव्य बोध दिवस -- जागृती अभियान अंतर्गत विवेकानंद विद्यालयात आयोजीत कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा संघटन मंत्री सुर्यकांत कुलकर्णी , प्रमुख अतीथी म्हणून शिवाजी मा. विद्यालयाचे मुख्याध्यापक लोखंडे सर , शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक बंडगर सर,  विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका देशपांडे मॅडम , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माध्य.  चे जिल्हाध्यक्ष शिवकुमार मुरगे उपस्थित होते. 

     या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोविड 19 वर मात करून पूर्वपदावर आलेले अभिमन्यू जंगाले व बालाजी सोळूके यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद च्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी बोलताना कुलकर्णी यांनी कर्तव्य आणि बोध याचे महत्व सांगून कर्तव्याबरोरच बोध होणे किती महत्वाचे आहे हे शिक्षकांच्याच अणूभवातील उदाहरणे देउन पटवून दिले. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मलवाड यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद हि कशा पध्तीने काम करीत आहे हे त्यांना आलेल्या विवीध कामांच्या अणूभवातील बाबी समोर ठेवून परिषदेचा उदात्त हेतू सांगितला. शिक्षक परिषदेच्या या कार्यक्रमासाठी विवेकानंद विद्यालयाची निवड केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाठी चारही ज्ञानमंदिरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार मुरगे यांनी तर उपस्थितांचे आभार अभिमन्यू जंगाले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या