*पोलिसांच्या व नागरिकांच्या दक्षतेमुळे चोरट्याचा एटीएम फोडीचा डाव फसला..!*
दिनांक 28 ते 29 जानेवारी च्या मध्यरात्री कनेरी चौक, लातूर व चाकुर येथील एका बँके चे असे दोन एटीएम फोडून त्यामधील पैसे चोरण्याचा अज्ञात चोरटया कडून प्रयत्न करण्यात आले.
परंतु आयत्यावेळी स्थानिक गुन्हे शाखाचे व गस्तीवरील नाईट पेट्रोलिंगची पोलिस जीप आल्याने नमूद चोरट्याने एटीएम चोरीची घटना अर्ध्यावरच सोडून पळ काढला.
पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग केला परंतु चोरटे कोळपा परिसरातून अंधाराचा फायदा घेत पळून गेले. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली जीप हिंगोली येथून चोरलेली असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस सदर घटनेच्या अनुषंगाने अधिक माहिती घेऊन तपास करीत आहेत.
नागरिकांना अवाहन आहे की, संशयास्पद व अवेळी फिरणारे/ वावरणारे लोक निदर्शनास येताच त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. जेणेकरून काही अनुचित प्रकार घडणार नाही.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.