पाखरसांगवी, वासनगाव परीसरातील शेतात बिबटया फिरत आहे
शेतकरी, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

फ़ाइल चित्र
लातूर प्रतिनिधी : दि. ३ जानेवारी :
लातूर तालुक्यातील खंडापुर, पाखरसांगवी, वासनगाव या भागात बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या परीसरातील शेतात बिबटया फिरत आहे ही माहिती मिळताच राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी या परीसरात वन विभागाकडून बिबटयाची शोध मोहीम सुरू करावी तसेच शेतकरी व नागरीकांची जिवीत हानी होणार नाही याची काळजी घेण्या संदर्भातील सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., व प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच शेतकरी, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
लातूर तालुक्यातील पाखरसांगवी, खंडापूर व वासनगाव रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसून आला आहे. ही माहिती मिळताच पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी तहसीलदार व वनाधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या असून कोणत्याही प्रकारची जीवीत हानी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदरील बिबट्यास पकडून जंगलात सोडण्यासाठी तातडीने कार्यवाही देखील सुरू करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत. तथापी बिबटयाला पकडण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत पाखरसांगवी आणि पंचक्रोशीतील जनतेने सावधानता बाळगावी, एकट्याने बाहेर फिरू नये, शेतात जाताना आपली लहान मुले व पशुधनाचीही काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
--------------

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.