स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस ठाणे एमआयडीच्या संयुक्त पथकाची कारवाई. दरोड्याच्या गुन्हा उघडकीस सहा आरोपी आरोपींना अटक. 46 लाख 50 हजार रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत*

 *स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस ठाणे एमआयडीच्या संयुक्त पथकाची कारवाई. दरोड्याच्या गुन्हा उघडकीस सहा आरोपी आरोपींना अटक. 46 लाख 50 हजार रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत*

लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो




         या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 01/02/2022 रोजी नवीन एमआयडीसी, लातूर येथील एका गोडाऊन मधून 16.7 लाख रुपये किमतीचे 548 कट्टे सोयाबीन अज्ञात आरोपीनी दरोडा टाकून चोरी केल्याची घटना घडली होती.त्यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 47/2022 कलम 395 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

         पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी घडलेला गुन्हा उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, डीवायएसपी जितेंद्र जगदाळे , डीवायएसपी औसा मधुकर पवार यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक अशोक बेले यांचे नेतृत्वात सदर गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे एमआयडीसी व सायबर सेल चे अधिकारी/ अंमलदार यांचे स्वतंत्र 06 पथक तयार करण्यात आले होते.

             तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. सदर पथक नमूद गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत  असताना सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषण व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती वरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या सोयाबीन गोडाऊन वरील दरोड्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी 12 नंबर पाटी परिसरात आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने 12 नंबर पाटी परिसरातील गोपनीय माहिती मध्ये मिळालेल्या ठिकाणी छापा मारला असता एक संशयित इसम मिळून आला.त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव नूर इसाक सय्यद, राहणार सुरतशाहवली दर्गा रोड,लातूर

असे असल्याचे सांगितले.

         पथकाने विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की,

दिनांक 01/02/2022 रोजी रात्री मी घरी असताना दोघेजण माझे घरी आले व सोयाबीनची गाडी भरायची आहे असे सांगून मला घेऊन गेले. दोन ट्रक मध्ये सोयाबीनचे कट्टे भरून ते दोन ट्रक पैकी एक ट्रक कृषीधन वेअर हाऊस, बाफना शोरूम च्या समोर नांदेड रोड येथे व दुसरा ट्रक मार्केट यार्ड मधील आडत व्यापारी गोपीनाथ खाडप यांचे दुकानाजवळ लावण्यात आले.तेथे हमालांचे मदतीने सोयाबीनचे कट्टे उतरून घेण्यात आले अशी माहिती दिली.

               त्यावरून आडत दुकानदार गोपीनाथ शेषराव खाडप यांचे कडून दरोड्यात चोरीस गेलेले 203 सोयाबीनचे कट्टे व गुन्ह्यात वापरलेला ट्रक क्रमांक एम.एच.12 एफ.सी. 7028 तसेच कृषीधन वेअर हाऊस चा मॅनेजर अजय सुग्रीव कांबळे याचे कडून 345 सोयाबीनचे कट्टे व गुन्ह्यात वापरलेला ट्रक क्रमांक एम.एच. 11 ए.एल 1885 असा एकूण 46 लाख 61 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

               नमूद गुन्ह्यात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून यातील मुख्य आरोपी नामे

1)बालाजी कोयले 

2) शिवगणेआप्पा व सोबतचे गुन्ह्यातील इतर साथीदार हे गुन्हा घडल्यापासून फरार असून पोलिस पथके त्यांचा शोध घेत आहेत.     

              गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे करीत आहेत.

            सदर सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा,लातूर चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील पथका मधील सपोनि सुधीर सूर्यवंशी, सपोनि राहुल बहुरे,सपोउपनि संजय भोसले,पोलीस अमलदार- राम गवारे, सुधीर कोळसुरे,अंगद कोतवाड,बाळू डांगे, संपत फड,राजेंद्र टेकाळे रामहरी भोसले, गोविंद जाधव, सचिन मुंडे ,सिद्धेश्वर जाधव,बंटी गायकवाड, माधव बिल्लापट्टे, बालाजी जाधव, दिनेश देवकते, प्रमोद तरडे, विनोद चिलमे, रवी कानगुले, तुराब पठाण , नवनाथ हसबे,प्रकाश भोसले,पोलीस ठाणे एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वातील पथकातील सपोनि दिपाली गीते, पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड , पोलीस अमलदार संजय फुलारी, अर्जुन राजपूत, विकास नळेगावकर, सिद्धेश्वर मदने, मदार बोपले, कोडे, तुरे, बिराजदार, शिंदे, बुजारे ,जाधव ,ओगले तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अशोक बेले,सपोनि सुरज गायकवाड, पोलीस अमलदार प्रदीप स्वामी, गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या