जमीयत उलेमा - ए - हिंद च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
लातूर - जमीयत उलेमा -ए - हिंद (अरशद मदनी ) जिल्हा लातूर अध्यक्ष हज़रत मौलाना इसराईल रशीदी यांच्या मार्गदर्शनाखाली मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी निवेदनात म्हटलं आहे कि आम्ही स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करत आहोत अशा वेळी कर्नाटक राज्यात हिजा़ब प्रकरणा वरून वाद निर्माण झाला आहे तेव्हा कु. मुस्कान या मुलीला महाविद्यालयात जात असताना राजकीय पक्षाचे नेते यांनी युवकांना पुढे करून कु.मुस्कान हिच्या समोर ’ जय श्रीराम ’ चे नारे देवुन भगवे ग़मजे तिच्या तोंडा समोर फिरवत होते, हा निदंनीय प्रकार असुन याचा आम्ही निषेध करतो व याबाबत भारतीय संविधानाच्या कलम 19 (1 ) अ नुसार अभिव्यक्तिच्या अधिकाराद्वारे सरंक्षीत आहे तसेच हा भाग गोपीनियतेच्या अधिकाराचा एक भाग आहे. धर्माचे पालन करण्याचा अधिकार हा सार्वजनिक सुव्यवस्था , आरोग्य आणि नैतिकतेचा मुलभुत अधिकार आहे धर्माचरण काय आहे आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार राज्याकडे नाही सर्वेच्च न्यायालयाने एका निर्णयात पुर्वीच स्पष्ट केले आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून हिजा़ब बंदी घालण्याचा अधिकार नाही असे निवेदनात नमूद केले आहे.
महिला मंडळाच्या वतीने सन्माननीय , शबाना इसराइल जावड़कर- साजिदा वकार अहमद-मारिया जुबेर अहमद-सईदा इसराइल जावड़कर- सबा मुजम्मिल साहब- रूकय्या आफरीन वकार-शेख अंजुम मूसा साहब सह महिला मंडळ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले ते त्यांनी स्विकारले व महामहिम राष्ट्रपती यांना कळवतो असे महिला शिष्टमंडळास सांगितले अशी माहिती जमीयत उलेमा -ए -हिंद यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.