https://youtu.be/XMcTfnu_dNg
कर्नाटक येथील हिजाब बंदच्या विरोधात एम आय एमच्या वतीने निदर्शने व धरणा आंदोलन करण्याचे निवेदन
औसा प्रतिनिधी
कर्नाटक येथील हिजाब बंदच्या विरोध म्हणून औसा तहसील कार्यालयासमोर निदर्शने व धरणा आंदोलन दि. 11 फेब्रुवारी 2022 शुक्रवार रोजी करण्यात येणार आहे त्या मागणीचे निवेदन औसा तहसीलदार यांना एम आय एम पक्षाच्या वतीने 10 फेब्रुवारी गुरुवार रोजी देण्यात आले.
या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे कर्नाटकातील उड्डपी येथील पीयू कॉलेज प्रशासन तथा शासन पुरस्कृत इस्लाम धार्मिक परिधान हिजाब ला विरोध करुन मुस्लिम समुदायातील स्त्रीयांचे धार्मिक अधिकारांचे संवैधानिक अधिकारांचे हनन केल्याचे या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 11 फेब्रुवारी 2022 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता औसा तहसील कार्यालयासमोर निदर्शने व धरणा आंदोलन करण्यात येणार आहे त्या मागणीचे निवेदन औसा तहसीलदार यांना एम आय एम औसाच्या वतीने देण्यात आले.यावेळी एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, नेते एडवोकेट गफुरूल्ला हाशमी कायदेशीर सल्लागार एडवोकेट रफिक शेख,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.