महिला संघटन वाढवून बहुजना चा आवाज बुलंद करणार वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर

 महिला संघटन वाढवून बहुजना चा आवाज बुलंद करणार वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर




औसा प्रतिनिधी. विलास तपासे 

औसा येथे शासकीय विश्रामगृहात औसा तालुका महिलांची बैठक घेऊन महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्ष मंजुषा निंबाळकर म्हणाल्या की लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये महिला एकत्र करून कार्यकारिणीची व पदाधिकाऱ्यांची निवड करणार आहोत तालुक्यांमध्ये महिलेचे संघटन करून एकजुटीने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने जिल्ह्यात तालुक्यात गावोगावी वंचित बहुजन आघाडी चे संघटन वाढविणार आहोत आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहोत गावा गावातील महिला एकत्र करून संघटना वाढवून येणाऱ्या काळामध्ये नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये सक्षम असलेल्या स्त्रिया उभा करून विजयी करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या गावोगावी शाखा स्थापन करून महिला संघटनेवर चांगल्या प्रकारचे काम करणार आहोत असे उद्दार वंचित बहुजन आघाडी च्या महिला जिल्हा अध्यक्ष मंजूषा निंबाळकर यांनी बोलताना सांगितले. 

दि.18 फेब्रुवारी रोजी औसा तालुका वंचित बहुजन आघाडी व लातूर जिल्हा वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने औसा तालुका महिला कार्यकारिणी  निवडण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या.

     सदर मुलाखती या वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा महिला आध्यक्षा .मंजुषाताई निंबाळकर यांच्या व महिला जिल्हा महासचिव आ.भारत बाई गायकवाड, महिला जिल्हा उपाध्यक्ष आ.सुमित्राताई स्वामी यांच्या नेत्रुत्वाखाली घेण्यात आल्या. 

  या वेळी औसा तालुक्यातील आनेक महिलानी उपस्थिती लावली.

    सदर मुलाखतीचा कार्यक्रम औसा तालुका आध्यक्ष  शिवरूद्र बेरुळे यांच्या आध्यक्षते खाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमात औसा तालुका महासचिव  श्रावण कांबळे,  सुभाष भालेराव, औसा तालुका प्रसिद्धीप्रमुख  विलास तपासे, शहराध्यक्ष इलियास चौधरी, तालुका उपाध्यक्ष श्री गंगाराम आडसुळे, युवा कार्यकर्ते ओमकर खरात,लखनगाव वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील अनेक गावातील महिलानी भाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या