बेलकुंड ची ग्रामसभा अनेक खडा जंगीने गाजली.
पोलिस बंदोबस्तात ग्रामसभा संपन्न.
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील बेलकुंड ग्रामपंचायत मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 190 घरकुलांची यादीचे वाचन करण्यात आले. अनेक लाभार्थ्यांकडून पाच हजार रुपये एका घरकुलाला ग्राम पंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी घेतले आहेत. अशी चर्चा ग्रामसभेत चालू होती. घरपट्टी भरण्यासाठी व फेर करण्यासाठी अनामत रक्कम घेऊन फेर करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले होते. त्यावर सामाजिक कार्यकर्ते व सम्राट युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी आवाज उठवून घरकुलांसाठी घेतलेले पैसे ग्रामपंचायत ने लाभार्थ्यांना परत करावे शासनाची कुठलीही योजना पैसे न घेता होतात परंतु बेलकुंड ग्रामपंचायत च्या काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरूपयोग करून गोरगरीब नागरिकांकडून पैसे घेऊन घरकुल देतो असे आश्वासन दिले होते. परंतु घेतलेले. पैसे परत करावे तसेच रेशन दुकानातील भाव फलक लावून लाभार्थ्यांना पावती देऊन धान्य वाटप करावे अशी ही मागणी केली. ह्या गोष्टीवर अमलबजावणी नाही झाल्यास येणार्या आठ दिवसात ग्रामपंचायत समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सम्राट युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. बेलकुंड ची ग्रामसभा सरपंच विष्णु कोळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ग्रामसेवक विकास फडणीस, गोविंद वाघमारे गोविंद वगरे, महमंद पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष शकील शेख, दादा पवार, राजेंद्र कांबळे, नाना निकते, अनंत शिंदे, बाळू पवार, राजेंद्र शिंदे, विठ्ठल साळुंके, अशोक जाधव, राजेंद्र शिंदे, समाधान कांबळे, आदी दोनशे हून अधिक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी भादा पोलिस स्टेशन चे कर्मचारी पोलीस बंदोबस्तात तैनात होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.