रामनाथ विद्यालयात"मिशन माझे गाव" उपक्रमाचे बक्षीस वितरण संपन्न

 रामनाथ विद्यालयात"मिशन माझे गाव" उपक्रमाचे बक्षीस वितरण संपन्न

----------------------------------------




 आलमला:-दि. 03फेब्रुवारी 2022 रोजी रामनाथ विद्यालय आलमला येथे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुप ने " मिशन माझे गाव" या संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धा परीक्षा घेऊन त्यात प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देऊन त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक आवटे अफसर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भास्कर सूर्यवंशी यांनी केले, कार्यक्रमाच्या पूर्वी संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी "मिशन माझे गाव" या संस्थेच्या अध्यक्षा कु. गांधले ऐश्वर्या, सचिव डॉ. मंगेश कुंभार तसेच त्यांचे सर्व सदस्य उपस्थित होते. या परीक्षेत 50 पैकी 49 गुण पटकावलेला विद्यार्थी बोकडे सौरभ संतराम याचा विशेष पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात संस्थेचे सदस्य कु. जाधव वैष्णवी व गणेश कुंभार यांनीही त्यांचा उपक्रम राबवण्या  मागचा हेतू आपल्या भाषणातून व्यक्त केला. स्पर्धेत सहभागी कुंभार प्रशांत व कमलाकर जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन कु.पोर्णिमा जाधव यांनी केले व सर्वांना या संस्थेशी जोडण्याचे आव्हान केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या