काॅग्रेस पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष स्व.अल्हाज अॅड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
औसा (प्रतिनिधी) काॅग्रेस पक्षाचे नेते तथा औसा शहराचे माजी नगराध्यक्ष स्व.अल्हाज अॅड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सा.लातूर रिपोर्टर,राहत मेडिकल फाऊंडेशन आणि अॅड.मुजिबोद्दीन पटेल विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राहत क्लिनिक,उदय पेट्रोल पंपाशेजारी,मेन रोड,औसा येथे दि.03 फेब्रुवारी 2022 गुरुवार रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..या शिबिराचे उद्घाटन औसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख , पाटील मॅडम ,कलमुगडी मॅडम,भिसे सर,व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या शिबिरात कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड दोन्ही लसीकरणचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांनी अद्याप पहिला डोस घेतला नाही आणि ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस घेऊन या राष्ट्रीय कार्याला पाठिंबा द्या आणि शारीरिक आरोग्य मजबूत करा.असेआवाहन अॅड मुजीबोद्दीन पटेल विचार मंचच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 52 नागरिकांनी कोवीड 19 लसीकरणाचा लाभ घेतला.या शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला.व तसेच हजरत सुरतशा ऊर्दू शाळेत मुलांना गणवेश वाटप करण्यात आले.तसेच औसा शहर काॅग्रेस पक्षाच्या वतीने आज औसा कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष स्वर्गीय अल्हाज अॅड मुजोबोद्दीन पटेल यांच्या जयंतीनिमित्त खाकेपीर दर्गा येथे त्यांच्या मजार वर व तसेच स्वर्गीय अल्हाज अॅड मुजोबोद्दीन पटेल यांच्या कबर वर फुलांची चादर अर्पण करण्यात आली.व तसेच औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी वसुधा फड यांना औसा नगरपालिका सांस्कृतिक सभागृहाला स्वर्गीय अल्हाज अॅड मुजोबोद्दीन पटेल यांचे नाव देण्यात यावे या मागणीचे निवेदन सादर केले आहे. .यावेळी मौलाना कलीमुल्ला,कारी रफीक सिराजी, मौलाना अमजदसाब, कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, सुनील मिटकरी,शहराध्यक्ष शकील शेख,समीयोद्दीन पटेल, शफीयोदीन पटेल, सदानंद शेटे,छोटुमिया शेख,मुज्जमील शेख,गुलाब शेख,अहेमद शेख,आदमखॉ पठाण,खुंदमीर मुल्ला, हमीद सय्यद,वहीद कुरेशी, फैयाज पटेल, नगरसेवक अंगद कांबळे,जयराज कसबे, राजेंद्र बनसोडे, गणेश कसबे,आवेसी सिद्दीकी,म.मुस्लीम कबीर,एकबाल शेख,मजहर पटेल,गनी सर,सलाउद्दीन पटेल मिस्बाह पटेल अज़हर पटेल आदिनी या जयंतीच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.