शिव महासंग्राम संघटनेच्या महीला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदी प्रा.ज्योती हालकुडे यांची निवड
शिव महासंग्राम संघटना ही कोणत्याही राजकीय पक्ष्याशी संबंधित नसलेली एक ज्वलंत क्रांतिकारी चळवळ म्हणून उभ्या महाराष्ट्रामधे वाढत असून महिलावर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी किल्लारी येथील
राणी लक्ष्मीबाई महीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता प्राध्यापक ज्योती हालकुडे यांची शिव महासंग्राम संघटनेच्या महीला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आले. ज्योती हालकुडे या मराठा आरक्षण महामोर्चात ही सहभागी होत्या यांच्या कार्याचा आढावा घेऊन यांची शिव महासंग्राम संघटनेच्या कार्यालयात
नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा अध्यक्ष व्यंकट कदम ,जिल्हा कार्याअध्यक्ष विकास पाटील, राजाबाई भोसले ,सुनंदा स्वामी, लक्ष्मी बिराजदार, सुलोचना भोसले, सुभद्राबाई ढेकणे सह आदि महीला व पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.