चाकूर तालुक्यातील शेत रस्त्यांचा कायापालट होणार !
प्रतिनिधी, हा.अ. खय्युम शेख
आज चाकूर तालुक्यातील #म्हाळंगी येथील दोन किलोमीटरच्या पाणंद रस्त्याच्या मातीकामाचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. या शुभारंभ प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी उपस्थित राहून कामाचे उदघाटन केले. तसेच प्रसंगी महाळंगी ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.
तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शेत पाणंद रस्त्यांची कामे सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर वाहने जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. असे मत यावेळी आमदार साहेबांनी व्यक्त केले.
या शुभारंभ प्रसंगी चाकूरचे तहसीलदार शिवानंदजी बिडवे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव काळे, शिवसेना तालुका अध्यक्ष गुणवंतराव पाटील, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता नवरखेले साहेब, अभियंता निकम, मा. जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे, युवक तालुका अध्यक्ष राहुल सुरवसे, बाळासाहेब पाटील झरीकर, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संतोष गंभिरे, महाळंगीचे उपसरपंच प्राध्यापक हेमंतराव पाटील, अनिलराव वाडकर, ॲड. धनराज पाटील, केशव सोनवणे, सुभाष घोडके, सचिन तोरे, समाधान जाधव, चेअरमन राजकुमार सोमवंशी, साखरअप्पा वाघमारे, सुभाष सोळंके, ॲड. धीरज पाटील, यशपाल पाटील, शंकर सोळंके, किसन सोळंके, विनायक चरक, जनार्दन कानगोले, विनायक धुमाळ, रमाकांत येचवाड, राजकुमार सोळंके, लालासाहेब सोळंके, नारायण कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.