लातूर शहरातील चार्ली पोलीस पेट्रोलिंगच्या धर्तीवर उदगीर शहरातही चार्ली पोलीस कार्यान्वित. 02 मोटारसायकली व 01 अधिकारी, 10 पोलीस अंमलदारांची ची नेमणूक


           *दिनांक 01/02/2022*


*लातूर शहरातील चार्ली पोलीस पेट्रोलिंगच्या धर्तीवर उदगीर शहरातही चार्ली पोलीस कार्यान्वित. 02 मोटारसायकली व 01 अधिकारी, 10 पोलीस अंमलदारांची ची नेमणूक*



      लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो   याबाबत थोडक्यात माहिती अशी की, काही दिवसापूर्वी लातूर शहरात चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंग कार्यान्वित करण्यात आली होती.त्याचे फायदे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे संकल्पनेतून उदगीर शहरातही दोन मोटरसायकली 24 तास पेट्रोलिंगसाठी कार्यान्वित करण्यात आल्या असून त्या दोन मोटरसायकलीवर आळीपाळीने ड्युटी करिता दहा पोलीस अंमलदार व इन्चार्ज म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

             सदर चार्ली पेट्रोलिंगद्वारे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना, महिलांना,लहान बालकांना व वयोवृद्धांना त्वरित मदत मिळणार असून ट्राफिक जाम,भांडण तक्रारी व काही अनुचित घटना घडत असताना डायल 112 वर कळविल्यावर लगेचच चार्ली पोलीस पेट्रोलिंगची मोटर सायकल सदर ठिकाणी पोहोचणार आहे.

              -चार्ली पोलीस पेट्रोलिंग पथक मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे.

1) सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड (इन्चार्ज)

2) पोलीस अंमलदार रविंद्र चीमोले

3) पोलीस अंमलदार संतोष पोते

4) पोलीस अंमलदार भीमाशंकर फुलारी

5) पोलीस अंमलदार बबन चव्हाण

6) पोलीस अंमलदार अक्षय मंडलापुरे

7) पोलीस अंमलदार निखिल बुट्टे

8) पोलीस अंमलदार रुपेश कजेवाड

9)पोलीस अंमलदार संदीप साठे 

10)पोलीस अंमलदार मिलिंद बराटे 

11)पोलीस अंमलदार गोविंद लटपटे.

                सदरच्या चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अमलदार यांच्याकडे स्वयंचलित शस्त्र व वायरलेस वाकीटॉकी राहणार असून त्याद्वारे चार्ली पेट्रोलिंग ड्युटीवरील पोलीस आपसात कम्युनिकेशन करू शकणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या