कौटुंबिक वादामध्ये मध्यस्थीची भूमिका महत्वाची

 

कौटुंबिक वादामध्ये मध्यस्थीची भूमिका महत्वाची







 लातूर-मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लातूर येथील कौटुंबिक न्यायालयात  मध्यस्थी जनजागृती शिबीराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद ए.वाय.एच तर प्रमुख पाहुणे म्हणुल ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.सलगरे हे उपस्थित होते.
   या शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना अ‍ॅड.सलगरेे म्हणाले की, कौटुंंबिक वादामध्ये एकदम टोकाची भूमिका घेवू नये,एक पाऊल मागे घ्यावे.वादामुळे घडणार्‍या घटस्फोटामुळे मुलांची खुप आबाळ होते. थोडा कमीपणा घेवून वाद मिटवावा.कोणताही वाद शक्यतो चिघळु देेवू नये.अनेक घडलेल्या, पाहीलेल्या कौटुंबिक वादाचे त्यांनी उदाहरणे
सांगितली.
  अध्यक्षपदावरून बोलताना कौटुंबिक  न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद ए.वाय.एच म्हणाले की,कौटुंबिक वाद विकोपाला नेऊ नयेत,शक्यतो ते घरातच मिटलेले चांगले. कुंटुबामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होत असतात पण त्यावर आत्ममंथन करणे महत्वाचे आहे. मनामध्ये जेंव्हा मनभिनता निर्माण होते तेव्हा वाद हे होणारच. सध्या तरूण वयाच्या मुला मुलीमध्ये वाद होण्याचे प्रमाण जास्त असुन अंहकारामुळे खुप मोठे नुकसान होत आहे. व्यावसायिक विचार करून भविष्याचा सखोल विचार करावा.वाद करण्याचे टाळावे. सुखी व समृध्द आयुष्य जगावे.
 या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एन.ए.गाताडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय कांबळे यांनी मानले. यावेळी कौटुंंबिक न्यायालयातील एस.डी.मोरे विवाह समुपदेशक वर्ग-1,श्रीमंत दि गायकवाड प्रबंधक, यदुनाथ महाराज, श्रीमती टी.जी कोेकाटे,ए.आर. ढगे, बेलीफ एस.बी.शेख,आर.एम.नांदुरकर,गणेश कुलकर्णी,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक एच.एम.चौंडीकर  हे उपस्थित होते. या शिबीरासाठी पक्षकार, विधीज्ञ मोठया संख्येने उपस्थित होतेे.
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या