गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव यांनी सत्कार

 गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव यांनी सत्कार






लातूर, 20 फेब्रुवारी

लातूर जिल्ह्यातील औसा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निवृत्ती जाधव (जांभळधरे) यांना नुकतीच लातूर पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. त्यामुळे निवृत्ती जाधव यांना गटशिक्षणाधिकारी म्हणून बढती मिळाल्याबद्दल लातूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशन च्यावतीने लातूर येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  डॉ.पांडुरंग शितोळे यांनी जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सक्तर केला. मराठा सेवा संघ लातूर जिल्ह्याचे पदाधिकारी बाळासाहेब यादव यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी संजय मोरे, डॉ एम डी पठाण, डॉ शाम जाधव, डॉ प्रशांत पाटील, विनोद चव्हाण आदींची प्रमुख उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या