तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील
सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट; आंतरराज्यीय जलसिंचन प्रकल्पांविषयी चर्चा
तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. २० : – तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासमवेत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आंतरराज्यीय संयुक्त जलसिंचन प्रकल्पांविषयीही विस्तृत चर्चा झाली.
या शिष्टमंडळासमवेतच्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.