किल्लारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन ठरणार ऊसउत्पादकांना संजीवनी
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
औसा-औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा पहिला साखर कारखाना म्हणून शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी संबोधला जातो 1972 साली सुरू झालेला हा साखर कारखाना मागील दहा वर्षापासून विविध अडचणीमुळे बंद होता. अवसायनात निघालेला हा साखर कारखाना कृती समिती व स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आता सभासदांच्या मालकीचा राहणार आहे. या कारखान्यावर 10 संचालकाचे प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त झाले असून सर्व विजयकुमार सोनवणे,विनोद बाबळसुरे,किशोर साठे,महादेव पाटील,बाबा उर्फ केशव पाटील,वामन पाटील,संजय पवार,विकास हराळकर,रमेश हेळंबे आणि शिवाजी कदम यांचा या अशासकीय संचालक मंडळामध्ये समावेश आहे.दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी अत्यंत साध्या पद्धतीने येथील संचालकांनी किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन सोहळा केला असून पाच व्यापारी पाच शेतकरी व 5 कामगारांच्या उपस्थितीमध्ये बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उरकला आहे. या संचालक मंडळाने अत्यंत काटकसरीने शासन दरबारी प्रयत्न करून अवसायनात निघालेला हा साखर कारखाना आता सभासद शेतकऱ्यांच्या मालकीसाठी शाबीत ठेवल्यामुळे आणि बॉयलर अग्नी प्रदीपण नंतर कारखान्याच्या सर्व प्रकारच्या मशिनरी दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून अकरा केवी चे ट्रांसफार्मर व पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली असून हा कारखाना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यास सज्ज होत आहे. त्यामुळे औसा,उमरगा,लोहारा आणि निलंगा या चार तालुक्यातील सभासदांचा समावेश असणारा सर्वात जुना साखर कारखाना सुरु होत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
किल्लारी साखर कारखाना सुरू होणार असल्याने आता ऊस उत्पादकांना संजीवनी मिळणार आहे. मागील दोन वर्षांच्या काळात उसाचे मुबलक क्षेत्र वाढले असल्यामुळे ऊस उत्पादकांचा ऊस साखर कारखाने घेऊन जाण्यास विलंब करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत किल्लारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन सोहळा झाला असून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गळीत हंगाम सुरू होणार अशी संचालकांनी दिल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याकामी उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर,माजी मंत्री बसवराज पाटील आणि सुरेश दाजी बिराजदार यांनी या संचालक मंडळाला मार्गदर्शन केले असून हा साखर कारखाना या महिन्याच्या अखेरीस गाळपास सज्ज होणार असल्याने ऊस उत्पादकांना हा कारखाना वरदान ठरणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.