३ फेब्रुवारी रोजी झालेल्या दुर्घटनेत मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तर जखमींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य
शास्त्रीनगर, येरवडा येथे ब्लू ग्रास बिझनेस पार्क येथील व्यवसायिक संकुलाचे पायासाठी बनवलेल्या लोखंडी जाळी चा सांगाडा कोसळून ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या दुर्घटनेत मध्ये पाच बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तर जखमींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य देण्यात आले.
कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे धनादेश दिले.
यावेळी कामगार उपायुक्त अभय गीते, सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर ,आमदार सुनील टिंगरे, कामगार नेते नितीन पवार, ॲड मोहन वाडेकर, महेबूब नदाफ, काशिनाथ नखाते, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, अमजद शेख आदीसह बिहारचे कामगार कुटुंबे उपस्थित होते.
यावेळी अभय गीते म्हणाले झालेली घटना दुख:द आहे आम्ही तातडीने घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला राज्य शासनाने तातडीने मंजुरी दिली त्यानुसार आज कामगारांच्या कुटुंबियांना अर्थ सहाय्य दिले आहे. यापुढे कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत नक्कीच सकारात्मक विचार केले जातील.
७ फेब्रुवारी ला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात यावे या घटनेत जे जे दोषी आहेत ते ठेकेदार, व मुळ मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कामगार संघटनांनी कामगार उपायुक्त यांच्याकडे भेट घेऊन चर्चा तसेच मुख्यमंत्री, कामगार मंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे केली होती .
सदर दुर्घटनेत सोहेल मोहम्मद, मोहम्मद शमीर, मोबिद आलम, मोहम्मद आलम, ताकाजी आलम या कामगारांचा मृत्यू झाला होता तर मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद फईम, मोहम्मद आलम, मोहम्मद रफिक मोहम्मद साहिल हे कामगार जखमी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.