*मार्चच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेला आणखीन एक गिफ्ट*
अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद,
फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. याआधीही 25 फेब्रुवारी रोजी किंमतीत वाढ झाली होती. याआधी 4 फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ होती.
मार्चच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. आज किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. याआधीही 25 फेब्रुवारी रोजी किंमतीत वाढ झाली होती. याआधी 4 फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ होती. तर 14 फेब्रुवारीला 50 रुपयांची वाढ होती. इतकंच नाहीतर 25 फेब्रुवारीला यामध्ये 25 रुपयांनी वाढ झाली होती. फेब्रुवारीमध्ये एलपीजीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली.
खरंतर, पुन्हा एकदा 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. किंमती वाढल्यामुळे दिल्लीत घरगुती गॅसचा दर 794 रुपयांवरून 819 रुपयांवर आला आहे. नवी किंमत मुंबईत 819 रुपये, कोलकातामध्ये 845.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 835 रुपये करण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली नाही. तर त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात दोनदा 50-50 रुपयांची वाढ झाली होती. फेब्रुवारी महिन्यात किंमती वेगवेगळ्या तीन प्रसंगी वाढल्या आणि एकूण वाढ 100 रुपये होती.
दरम्यान, येत्या दोन वर्षात एक कोटीहून अधिक मोफत एलपीजी कनेक्शन देण्याची आणि लोकांना एलपीजी सहज मिळावा यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. देशातील 100 टक्के लोकांना स्वच्छ इंधन पोहोचवण्याचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ही योजना तयार केली गेली आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे. पेट्रोलियम सचिव तरुण कपूर म्हणाले की, कमी कागदपत्रं आणि स्थानिक रहिवासी पुरावा नसल्यासही कनेक्शन देण्याची योजना तयार आहे. इतकंच नाहीतर, ग्राहकांना तीन डीलर्सकडून पुन्हा एक रिफिल सिलिंडर मिळण्याचा पर्यायही देण्यात आला आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.