शासकीय आश्रमशाळा राईनपाडा येथे जागतिक महिला दिन साजरा
स्त्री ही विश्वाचा आरसा आहे: सोनी सूर्यवंशी
साक्री/ धुळे /प्रतिनिधी
८ मार्च हा दिन देशभरात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असून या निमित्ताने शासकीय आश्रमशाळा राईनपाडा येथे महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कर्तुत्ववान थोर महिला माता राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई याच्या प्रतिमा चे पूजन सौ पुष्पाबाई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासकीय आश्रमशाळा च्या अधिक्षका सौ सोनी देविदास सूर्यवंशी यांनी थोर महिलाची यशोगाथा सांगून मुलींनी प्रत्येक वेळी सतर्क राहण्याचा सल्ला दिला. तसेच निस्वार्थ सेवा करणारी सामान्य घरातली एक सामान्य स्त्री ही खरोखर एखाद्या क्षेत्रात काम करून नाव कमावणाऱ्या प्रसिध्द महिले पेक्षा काकणभर ही कमी नाही कारण स्त्री ही या विश्वाचा आरसा आहे. कारण स्त्रियांनी अनेक महापुरुषांना जन्म दिला. स्त्रियांनी शिक्षणात भरारी घ्यावी असे आश्रमशाळा राईनपाडा च्या अधिक्षका सोनी सूर्यवंशी यांनी महिला दिनाच्या दिवशी महिलांना व शाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणायला , या कार्यक्रमाला श्रीमती मीठाबाई पाडवी, श्रीमती काळीबाई चौधरी श्रीमती धवळीबाई गावित व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होत्या
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.