श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथे महिला सक्षमीकरण करण्याबाबत व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन जाणीव-जागृती उपक्रम रॅलीचे आयोजन
आलमला:- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथे 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून दिनांक 8 मार्च 2022 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरण करण्याबाबत व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन जाणीव-जागृती उपक्रम रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येओला कचरा सुका कचरा वेगळा करण्याची उपयुक्तता समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगी बाणवली जावी, यासाठी विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गावातून जाणीव जागृती संदेश देणारी रॅली विविध घोषवाक्य देऊन काढण्यात आली. त्यात ओल्या कचऱ्यापासून उत्कृष्ट प्रतीचे खत तयार बनवता येते व सुक्या कचऱ्यापासून प्लास्टिक सारख्या वस्तूंचा पुनर्वापर करून निसर्गावरील ताण कमी करता येतो. हे या रॅलीतून संबोधित करण्यात आले. या रॅलीला यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच याच दिवशी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत, विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवी ते दहावी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग व त्याची प्राथमिक लक्षणे, घ्यावयाची काळजी उपचार या विषयी मार्गदर्शन करून त्यांनी एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत प्रथम कु. मेघना बिराजदार, द्वितीय कु. सृष्टी कुंभार तर तृतीय कु. धाराशिवे दिपाली या विद्यार्थिनींनी बक्षीस प्राप्त केले. या उपक्रमासाठी डॉ. पाटील एस.एस. वैद्यकीय अधिकारी उपकेंद्र आलमला, डॉ. कवठकर एम. एम. वैद्यकीय सहाय्यक, ग्रामीण रुग्णालय औसा, आरोग्य सेविका सौ. शिंदे पी. एस.श्री बंडे एस. जी आरोग्य सेवक वविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील ,पर्यवेक्षक आवटे सर उपस्थित होते...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.