औसा येथील नविन वस्तीत मालमत्ता धारकांना नगर पालिकेच्या ठरावाप्रमाणे गुंठेवारी आकारण १० रु. चौरस फुट प्रमाणे करा

  औसा येथील नविन वस्तीत मालमत्ता धारकांना नगर पालिकेच्या ठरावाप्रमाणे

गुंठेवारी आकारण १० रु. चौरस फुट प्रमाणे करा 




औसा रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो






सविस्तर वृत असे की औसा शहराची हद्दवाढ होऊन बराच सा भाग नगर परिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. नविन हद्दीतील प्लॉटधारकांना नगर पलिकेत नाव नोंदणी करण्याकरीता गुंठेवारी पध्दतीने पैसे भरून घेऊन नाव नोंदणी करणे चालु आहे. परंतु शासकीय नियमाप्रमाणे ३० रु. प्रती चौरस फुट गुंठेवारी आकारणी असताना नगर पालिकेने बहुमताने ठराव घेऊन १० रु. प्रती चौरस फुट आकारणी करण्याचे ठरविले आहे. याबाबतची माहिती औसेकरांना वर्तमानपत्रातुन मिळालेली आहे.



परंतु आपल्या कार्यालयामार्फत ठरावाला बगल देऊन गुंठेवारी अकारणी ३० रु. प्रमाण आकारण्यात येत आहे. जे जनतेच्या हिताच्या विरुध्द आहे. ज्यामुळे नविन हद्दीतील नागरीकांन •आर्थिक भुरदंड सोसावा लागत आहे.


तरी सदर अर्जाची दखल घेऊन पालिकेने बहुताने घेतलेल्या ठरावानुसार नविन हद्दीती गुंठेवारी आकारणी ही १० रु. प्रती चौरस फुट प्रमाणे आकारण्यात यावी ही विनंती. टिप :- गुंठेवारी आकरणी बाबत घेण्यात आलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत मला देण्यात यावा अशी मागणी 

शेख मुजम्मील महंमद,

रा. औसा यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या