.पोलीस उपमहानिरीक्षक परिक्षेत्र , नांदेड श्री.निसार तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाची वार्षिक तपासणी संपन्न*

        

पोलीस उपमहानिरीक्षक परिक्षेत्र , नांदेड श्री.निसार तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाची वार्षिक तपासणी संपन्न*






लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 


          याबाबत थोडक्यात माहिती अशी की, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री.निसार तांबोळी हे लातूर जिल्ह्याचे वार्षिक तपासणी दौऱ्यावर आले होते. त्यांचे

वार्षिक निरीक्षण 7 मार्च ते 11 मार्च व तदनंतर 23 मार्च ते 24 मार्च ला होऊन पूर्ण झाले. दरम्यान त्यांनी लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, शाखा चे निरीक्षण केले. त्यादरम्यान पोलीस मुख्यालय, लातूर येथे पोलीस परेडचे व विविध प्रत्याशिका चे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्ह्याच्या 2021 वर्षाच्या कामगिरीचे 2020 वर्षाच्या कामगिरीशीही संख्यात्मक तुलना व अवलोकनही त्यानिमित्ताने करण्यात आले. आणि त्या आधारे एकंदरीत कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले.


*दारूबंदी कायद्यांतर्गत केलेली कारवाई*

सन 2020 मध्ये 1,551 दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर सन 2021 मध्ये एकूण 2,441 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

*जुगार प्रतिबंध अधिनियम* अन्वये सन 2020 मध्ये 418 केसेस दाखल करण्यात आले होते तर सन 2021 मध्ये  802 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

*एन डी पी एस कायद्याया नुसार* सन 2020 मध्ये 02 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर सन 2021 मध्ये एकूण 06 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

*ई.सी. ॲक्ट* नुसार सन 2020 मध्ये 02 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर सन 2021 मध्ये 06 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 *पिटा अक्ट* नुसार सन 2020 मध्ये 03 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर सन 2021 मध्ये 06 गुन्हे दाखल करून तपास करण्यात आला.

*आर्म ॲक्ट* नुसार सन 2020 मध्ये एकूण 06 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर सन 2021 मध्ये एकूण 26 गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्यात शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत.

*गुटका केसेस* सन 2020 मध्ये एकूण 44 गुन्ह्याची नोंद झाली होती तर सन 2021 मध्ये एकूण 66 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

*चंदन चोरीचे छापे* सन 2020 मध्ये चंदन चोरीचे 03 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर सन 2021 मध्ये एकूण 10 गुन्हे दाखल करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

*कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये* सन 2020 मध्ये एकूण अकरा लोकावर कारवाई करण्यात आली होती तर सन 2021 मध्ये एकूण 136 इसमा विरुद्ध वर नमूद कारवाई करण्यात आलेली आहे.

*मोटार वाहन कायद्यान्वये* सन 2020 मध्ये 214 कारवाया करण्यात आल्या होत्या तर सन 2021 मध्ये 399 इतक्या कारवाया करण्यात आले आहेत.

*कलम 283 भादवी* नुसार सन 2020 मध्ये 373 कारवाया करण्यात आल्या होत्या तर 2021 मध्ये 436 कारवाया करण्यात आलेले आहेत. 

*एकूण भादवीच्या कलमानुसार दाखल गुन्ह्यांची संख्या* 2020 मध्ये 3,668 इतकी होती तर सन 2021 मध्ये एकूण दाखल गुन्ह्यांची संख्या 5,735 आहे

*सामाजिक शांतता अबाधित राखण्यासाठी* सन 2020 मध्ये एकूण 8,018 लोकावर प्रतिबंधात्मक  कारवाई करण्यात आली होती. तर सन 2021 मध्ये एकूण 9,160 लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आले आहे.


*चोरीस गेलेल्या मुद्देमाला  पैकी हस्तगत मालाची टक्केवारी*


दरोडामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमाल पैकी हस्तगत केलेल्या मुद्देमालाची टक्केवारी 2020 मध्ये 47% होती तर सन 2021 मध्ये हस्तगत मुद्देमालची टक्केवारी वाढून 74% इतकी झाली आहे.

जबरी चोरी मध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमाल पैकी सन 2020 मध्ये 35 % मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.सन 2021मध्ये 47% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

*अवैध धंद्या मधील जप्त मालाची किंमत*

दारूबंदी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या मालाची किंमत सन 2020 मध्ये

77,09,915/_ रुपये इतकी होती. तर ती सन 2019 मध्ये वाढून 1,48,76,078/_ रुपये इतकी झाली आहे.

जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार केलेल्या कारवाई मधील जप्त मुद्देमालाची किंमत सन 2020 मध्ये 28,27,221/- रुपये होती तर सन 2021 मध्ये 1,53,8,032/- इतकी होती.

 ई.सी. ऍक्ट नुसार केलेल्या कारवाई मधील जप्त मुद्दे मालाची किंमत सन 2020 मध्ये 4,11,900/- रुपये होती तर सन 2021 मध्ये 20,97,000/- रुपये इतकी होती.

गुटकाच्या केसेस मध्ये जप्त केलेल्या मध्ये मालाची किंमत सन 2020 मध्ये 18,6,44,647 /- रुपये होती तर सन 2021 मध्ये 27,52,5,548/- रुपये इतकी आहे.

            तसेच 2021 मध्ये 542 वाहने मूळ मालकांना परत करण्यात आली. तर 675 बेवारस वाहनांची लिलाव पद्धतीने निर्गती करून त्यामधून मिळालेली 28,58,600 रक्कम शासनना कडे जमा करण्यात आली असून आणखीन 275 वाहन लिलाव प्रक्रिया चालू आहे.

             एकंदरीत कारवाया अशाच पद्धतीने चालू ठेवणे व याही पेक्षा अजून चांगल्या प्रकारे, जोशाने काम करणे बाबत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी संबंधितांना सूचना केल्या आहेत.


 *आलेल्या तक्रारदाराचे समाधान करणे, अवैध धंद्यांचे उच्चाटन करणे, अवैध दारू विक्रेते आणि मटक्यावल्यावरती कठोर कारवाई करणे, शहरातील टुकारगिरी करणारे घटक मोडून काढणे याबाबत त्यांनी विशेष सूचना दिल्या आहेत* .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या