माजी सभापती अजित माने , माजी नगराध्यक्ष शेख हमीद भाजपातून सहा वर्षासाठी निलंबित

 

माजी सभापती अजित माने , माजी नगराध्यक्ष शेख हमीद भाजपातून सहा वर्षासाठी निलंबित

माजी सभापती अजित माने , माजी नगराध्यक्ष शेख हमीद भाजपातून सहा वर्षासाठी निलंबित

लातूर :- निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने , रेणापूर संगायो समितीचे माजी अध्यक्ष ईश्वर गुडे आणि निलंग्याचे माजी नगराध्यक्ष शेख हमीद या तिघांना सहा वर्षासाठी भारतीय जनता पार्टीतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ , रमेशआप्पा कराड यांनी दिली . भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध आणि घटनात्मक कार्य करणारी जगातील सर्वात मोठी राजकीय संघटना असून संपूर्ण देशभरात विस्तार झालेल्या या पक्षाने लाखो कार्यकर्त्याच्या मेहनतीवर यशाचे अनेक शिखर गाठले पक्षाचा विस्तार व्हावा याकरिता अनेकांनी आपले आयुष्य घालविले , त्याग केला , कष्ट घेतले हे विसरता येणारे नाही . पक्षात राहून कोणी बेईमानी करत असेल तर त्यांची पक्षाकडून गांभीर्याने दखल घेतली जाते . अजित माने , ईश्वर गुडे आणि शेख हमीद इब्राहिम यांनी गेल्या काही दिवसापासून पक्षाला पोषक नव्हे तर बाधा येईल असे कार्य केले आहे . वेळोवेळी सूचना देऊनही पक्षाला घातक ठरणारे वर्तन सुरूच ठेवल्याने याची गंभीरतेने दखल घेऊन सहा वर्षासाठी तिघांनाही भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आले आहे . अजित माने , ईश्वर गुडे आणि शेख इब्राहिम या तिघांनाही याबाबत एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे . येत्या काळात कार्यकर्त्याच्या निवडणुका असल्याने भाजपा पूर्णपणे ताकतीने लढणार असून जिल्हाभरातील भाजपाच्या पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पक्षाकडून वेळोवेळी आयोजित केलेले कार्यक्रम उपक्रम यशस्वी करावेत , ध्येय धोरणे राबवावेत आणि पक्षाच्या आदेशाचे पालन करावे असे आव्हानही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ . रमेशआप्पा कराड यांनी केले आहे .

पक्षांनी आज मला निलंबित केले त्याचे मी स्वागत करतो पक्षात राहून पक्ष विरोधी कार्य करणाऱ्याना पक्ष डोळे झाक करीत आहे.पक्षवाढवी साठी सच्चे कार्यकर्ते पक्षाला नको असतील .गेल्या औसा विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्ष विरोधी भूमिका घेतलेल्याना पक्षाला त्यावेळी कारवाई करावी वाटली नाही त्यावेळी हे कदाचित झोपी गेले होते .इमानदारी ने पक्षाचे काम करणारे आता पक्षाला नको असतील म्हणून ही कारवाई केले असेल.

अजित माने
माजी सभापती पंचायत समिती निलंगा

मी पक्षाचा साधा सदस्य सुध्दा नाही त्यामुळे पक्षांनी आज जो निलंबन केले त्या निलंबनात तथ्य नाही मी भाजपा सोबत होतो. सोबत राहून कधीच गद्दारी केली नाही पक्ष व नेत्ववला नुकसान होईल असे कृत केले नाही माझ्या आयुष्यात मी भाजपा च्या चिन्हा वर निवडणूक सुध्दा लढवली नाही . निलंगा विधानसभा मतदारसंघात पक्ष शून्य होता त्यावेळी आम्ही पक्ष वाढवावं म्हणून भरपूर कष्ट केले आहे आज पक्षाला चांगले दिवस आल्याने पक्षाला सल्ला देणारे व प्रश्न विचारणारे आता नको म्हणून मला बाजूला केले आहेत .पक्ष विरोधी अथवा पक्षाला बाधा येईल असे कृत केल्याचा आरोप आहे हे त्यांनी सिद्ध करूनच दाखवावा , निलंबन म्हणजे हे काय सरकारी नौकरी आहे का?

हमीद शेख 
माजी नगराध्यक्ष ,निलंगा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या