महिलांसाठी मासिक पाळी समस्या नव्हे वरदानच ! डॉ. ज्योती सुळ

 महिलांसाठी मासिक पाळी समस्या नव्हे वरदानच !

डॉ. ज्योती सुळ




दि. 11 मार्च 2022 रोजी दयानंद शिक्षण संस्था व दयानंद कला महाविद्यालयातील फॅशन डिझाइन, ॲनिमेशन विभाग व Area 24 इनर व्हिल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त Women’s Health Awareness Awarness on Menstrual Hygiene & Mestrual Cup, मासिक पाळीतील घ्यावयाची काळजी व त्या विषयीची जागरूकता या विषयावर प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्योती सुळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲनिमेशन विभाग प्रमुख प्रा. दुर्गा शर्मा प्रास्ताविक मांडत असताना असे म्हणाल्या की, मासिक पाळीत लातूर सारख्या निमशहरी मुली स्वत : ची योग्य ती काळजी न घेता, योग्य आहार न घेता मासिक पाळीत वावरताना दिसतात. मासिक पाळीबद्दलेचे समज आणि गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठीच या कार्यक्रमाची आखणी केली आहे. या व्याख्यानाद्वारे डॉ. सुळ यांनी विद्यार्थीनीशी मनमोकळेपणाने संवाद साधला व स्त्रियांचे मासिक पाळीतील समज, गैरसमज, स्वच्छता, अंधश्रद्धा या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. मासिक पाळीतील आजार त्याबद्दलची जागरूकता यांसंबंधी महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. मासिक पाळीबद्दल चुकीच्या समजतीतून स्त्रियांचे आरोग्य धोक्यात येते. यासंबंधी तसेच मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी वापरावयाची साधने असे विस्तृत असे मार्गदर्शन केले. डॉ. ज्योती सुळ यांनी खुपच रंजक प्रकारे पुर्ण व्याख्यान सादर केले. त्यामुळे या विषयीची गंभीरता विद्यार्थीनीना समजलीच तसेच विद्यार्थीनी च्या चेह-यावरील स्मीत कायम राहिले. या कार्यक्रमासाठी Area 24 Inner Wheel Club च्या अध्यक्षा माधवी जोधवानी, सदस्य अंकीता जोधवानी व सुषमा खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड यांनी शुभेच्छा देऊन मनोबल वाढवले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फॅशन व अॅनिमेशेन विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच सूत्रसंचालन फॅशन विभागातील विद्यार्थीनी कु. शैला करपे व टिनल पटेल यांनी केले व आभार प्रा. सुवर्णा लवंद यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या