बेलकुंड येथील संजीवनी क्लिनिकमध्ये डॉ. माधव किरवले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न.
औसा प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले नव्हते. रक्ताचा तूरवटा लक्षात घेऊन वाढदिवसानिमित्त इतर खर्च करण्यापेक्षा रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय डॉ किरवले यांनी घेतला. ह्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला असून 21 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.
बेलकुंड चे डॉ. माधव किरवले यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी क्लिनिक बेलकुंड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान करून डॉ. माधव किरवले साहेब याना वाढदिवसानिमित्त अनेक नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. . त्यावेळी बेलकुंड चे सरपंच विष्णु कोळी, तंटामुक्त अध्यक्ष शकील शेख, राष्ट्रवादी औसा तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत, माजी जिल्हापरिषद सदस्य संदिपान शेळके, सुधाकर लोकरे, वंचित व्यवस्थापन बहुजन अध्यक्ष विलास तपासे, माजी अध्यक्ष गोविंद वगरे, आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गोविंद वाघमारे, रामेश्वर निर्मळे, चंद्रकांत सोलापुरे, बालाजी जाधव संचालक संजीवनी ब्लड बँक, रोहिणी कातळे जनसंपर्क अधिकारी, तंत्रज्ञ महादेवी जोगदंड, करिष्मा कांबळे, श्रीदेवी कांबळे, स्नेहा मुळे, मंदाकिनी महापूरे, इत्यादी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.